तरुण भारत

कर्नाटक: हुबळी तहसील कार्यालयाच्या वतीने विशेष वॉर रूमची स्थापना

बेंगळूर /प्रतिनिधी :

हुबळी तालुक्यातील कोरोना रूग्णांना वेळेवर वैद्यकीय मदत मिळावी यासाठी हुबळी शहर तहसीलदार यांच्या कार्यालयाने विशेष युद्ध कक्ष सुरू केला आहे. राज्यात पहिल्यांदाच तालुका स्तरीय वॉर रूमची स्थापना केली आहे. दोन आठवड्यांपासून वॉर रूम कार्यरत आहे. कोविड केअर सेंटर (सीसीसी) मध्ये रुग्ण हलविण्यास विलंब झाल्याबद्दल केआर सर्कल येथे निषेध आंदोलन केल्यानंतर ही सुविधा सुरु केली आहे.

या विशेष वॉर रूममध्ये काम करणारे अधिकारी डॉक्टर, नर्स आणि रुग्णवाहिका चालकांना वेबएक्स व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुविधेद्वारे सूचना दिली जाईल. कोविड ऑपरेशन्सचे तालुका समन्वयक अनिल कुमार जलगेरी यांनी आम्ही रुग्णांची माहिती आणि स्थान रुग्णवाहिका चालकासह आणि रुग्णवाहिका हालचालीचा मागोवा घेऊ. तसेच त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी आणि रुग्णाला हलविण्यासाठी किती वेळ लागतो. तसेच घरी रुग्णांना भेट देणाऱ्या डॉक्टरांवर नजर ठेवण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सुविधेचा वापर करू, असे त्यांनी सांगितले.
हुबळी क्षाराचे तहसीलदार शशिधर मडियाल यांनी , तालुक्यातील कर्मचारी कोविड ड्यूटीवर आहेत आणि रुग्णांना सीसीसीमध्ये हलविण्यासाठी नऊ रुग्णवाहिका कार्यरत आहेत. अशी माहिती दिली.

Advertisements

Related Stories

बेळगावसह 16 जिल्हय़ांत अनलॉक 2.0

Patil_p

ग्रामीण भागात बससेवेचा बोजवारा

Amit Kulkarni

तंत्रज्ञानाच्या आहारी जाता कामा नये

Amit Kulkarni

चोर्ला घाटातील धबधबे पर्यटकांना घालताहेत साद

Amit Kulkarni

स्वामी विवेकानंद जयंती सिद्धार्थ बोर्डिंगमध्ये साजरी

Amit Kulkarni

कोरोना रोखण्यासाठी गर्दी टाळा, मास्क वापराच!

Amit Kulkarni
error: Content is protected !!