तरुण भारत

पुणे विभागातील 84, 602 रुग्ण कोरोनामुक्त!

ऑनलाईन टीम / पुणे :


पुणे विभागातील 84 हजार 602 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 लाख 27 हजार 820 झाली आहे. तर ॲक्टीव्ह रुग्ण 39 हजार 885 आहे. कोरोनाबाधीत एकुण 3 हजार 333 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.61  टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 66.19 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली. 

Advertisements


पुणे जिल्हयातील 1 लाख 264 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 70 हजार 904 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 27 हजार 70 आहे.  कोरोनाबाधित एकूण 2 हजार 290 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.28 टक्के इतके आहे. पुणे जिल्हयामध्ये बरे  होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण  70.71  टक्के आहे. 


आजपर्यत विभागामध्ये एकुण 6 लाख 55 हजार 967 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 27 हजार 820 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे. 

Related Stories

गजा मारणे प्रकरणी भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांना अटक

Rohan_P

नीती आयोगाचे धोरण कारखानदारांच्या हिताचे

Abhijeet Shinde

मागासवर्गीय आरक्षण सुधारणा अध्यादेश

Abhijeet Shinde

विरार रुग्णालयातील दुर्घटना ही काही राष्ट्रीय बातमी नाही : राजेश टोपे

Abhijeet Shinde

१० वी च्या प्रश्न पत्रिकेत महिलांविरोधात परिच्छेद

Sumit Tambekar

गॅस सिलेंडर देणाऱ्या 34 सेवादूतांचा मातृशक्तीच्या हस्ते सन्मान

Rohan_P
error: Content is protected !!