तरुण भारत

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करावेत : अजित पवार

ऑनलाईन टीम / पुणे : 


‘कोरोना’ विषाणू संसर्ग रोखण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करावेत. नागरिकांच्या सहकार्याशिवाय ‘कोरोना’ संसर्गावर नियंत्रण मिळवता येणे शक्य नाही, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

Advertisements


पुणे शहरातील ‘कोरोना’च्या वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिका, भारतीय जैन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या ‘मिशन झिरो पुणे’ या उपक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज पुणे येथे पार पडले, त्यावेळी ते बोलत होते. 


उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पुणे शहरामध्ये ‘कोरोना’च्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी ‘मिशन झिरो पुणे’ हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे. सार्वजनिक हितासाठी या उपक्रमात भारतीय जैन संघटना ही पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून काम करत आहे, ही चांगली बाब आहे. या ‘कोरोना’च्या लढ्यात सामान्य नागरिकांनीही साथ देण्याचे आवाहन करुन या उपक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुभेच्छा दिल्या.


यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल, माजी महापौर प्रशांत जगताप आदी उपस्थित होते.

Related Stories

पुरात आत्तापर्यंत ४३६ जणांचे बळी; मंत्री वडेट्टीवारांनी दिली माहिती

Abhijeet Shinde

महाराष्ट्र : मागील 24 तासात 69 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह

Rohan_P

सोलापूर जिल्ह्यातील ३६ हजार शेतकऱ्यांच्या बांधावर बियाणे

Abhijeet Shinde

सोलापूर : कॉ. आण्णाभाऊ साठेंना माकप कडून विनम्र अभिवादन

Abhijeet Shinde

शरद पवारांकडून दिवंगत नगरसेवक दत्ता साने यांच्या कुटुंबियांचे सांत्वन

Rohan_P

केंद्राला काय करायचं ते करू द्या, शेतकऱ्यांच्या हिताला धक्का लागू देणार नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Abhijeet Shinde
error: Content is protected !!