तरुण भारत

उच्च वीज दाबाने वाकरेत घरगुती साहीत्य जळाले, चार लाखांचे नुकसान

प्रतिनिधी  / वाकरे

वाकरे ( ता. करवीर ) येथे अतिउच्च वीज दाबामुळे २८ टीव्ही संच आणि २ फ्रिज जळाल्याने सुमारे साडेतीन ते चार लाख रुपयांचे नुकसान झाले. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की गेले दोन तीन दिवस भोगावती नदीला आलेल्या महापुरामुळे महावितरणच्या बालिंगे वीज उपकेंद्रातून वाकरे आणि परिसरातील वीजपुरवठा खंडित होत होता. महापुराबरोबरच मुसळधार पावसामुळे ठीकठिकाणी विद्युत खांब आणि वीजलाईनवर झाडे पडल्याने विद्युत पुरवठा खंडित होत आहे. वीज वितरण कंपनीचे कर्मचारी हा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत होते. गुरुवारी रात्री उशिरा वाकरे येथे वीज पुरवठा सुरू झाला. दरम्यान बसस्टॉप परिसरातील नागरिकांनी आपले टीव्ही आणि फ्रीज सुरू केल्यानंतर त्यामधून धूर येऊ लागला. सुमारे २८ ग्राहकांचे टिव्ही संच आणि ग्राहकांचे फ्रीज जळाले. त्यामुळे ग्राहकांचे साडेतीन ते चार लाख रुपयांचे नुकसान झाले. या सर्व ग्राहकांना वीज वितरण कंपनीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी  ग्राहकांकडून होत आहे.

सरपंच तोडकर यांची तत्परता

दरम्यान वाकरे फाटा रस्त्यावर पहाटे फिरायला जाणारे नागरिक सुधाकर पाटील यांनी रस्त्यावर झाड पडल्याचे सरपंच वसंत तोडकर यांना कळवले,त्यांनी अवघ्या अर्ध्यातासात ग्रामपंचायत यंत्रणा गतिमान करून झाड तोडून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला.

Related Stories

पाटगाव परिसरात अतिवृष्टी , तिरवडे येथे घरांची पडझड

Abhijeet Shinde

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उद्या साताऱयात

Patil_p

सदाशिवगडावर घुमला वृक्ष संवर्धनाचा नारा

Patil_p

परमबीर सिंग यांच्याकडून अनिल देशमुखांविरोधात सीबीआय चौकशीची मागणी

Abhijeet Shinde

दुसऱया कट ऑफ लिस्टमध्ये विज्ञान , वाणिज्य अव्वल

Patil_p

साताऱ्यात शनिवारी पाणी पुरवठा राहणार बंद राहणार

Abhijeet Shinde
error: Content is protected !!