तरुण भारत

दिल्लीत दिवसभरात 1192 नवे कोरोना रुग्ण; 23 मृत्यू

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


दिल्लीत आज दिवसभरात 1192 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 23 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 1 लाख 42 हजार 723 वर पोहचली आहे. यामधील 10 हजार 409 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

Advertisements


शुक्रवारी 1108 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेे. तर आतापर्यंत 1 लाख  28 हजार 232 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 4082 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्ली वासियांची चिंता वाढली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

 
ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत आतापर्यंत जवळपास 11 लाख 43 हजार 703 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 5612 आरटीपीसीआर टेस्ट आणि 17,773 रैपिड एंटिजेन टेस्ट करण्यात आल्या आहेत. 

Related Stories

दोन्ही डोस घेतल्यास मृत्यूचा धोका 95 टक्क्यांपर्यंत कमी

Patil_p

बारामुल्लातील चकमकीत दहशतवाद्याला कंठस्नान

Amit Kulkarni

उत्तराखंडात कोरोनाबाधितांची संख्या 52 हजाराच्या उंबरठ्यावर

Rohan_P

पंजाबमध्ये 292 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

Rohan_P

शाहरुख खानने आर्थर रोड तुरुंगात जाऊन घेतली आर्यनची भेट

Abhijeet Shinde

चीन दूतावासाबाहेर तैवानशी संबंधित फलक

Patil_p
error: Content is protected !!