तरुण भारत

सातारा जिल्ह्यात आज 67 नागरिकांना डिस्चार्ज, 464 नमुने पाठवले तपासणीला

प्रतिनिधी / सातारा

सातारा जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 67 नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले, तर 464 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तर एका कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये

कराड तालुक्यातील कराड शहरातील शनिवार पेठेतील 32 वर्षीय पुरुष., मलकापुर येथील 33, 52, 33, 28, 33, 25 वर्षीय पुरुष व 1 महिला., हजारमाची येथील 35 वर्षीय पुरुष., आगाशिवनगर येथील 40 वर्षीय पुरुष व 30, 36 वर्षीय महिला., कृष्णा मेडीकल कॉलेजमधील 26 वर्षीय पुरुष., कार्वे येथील 32 वर्षीय महिला., कोयना वसाहत येथील 20 वर्षीय युवक.,

पाटण तालुक्यातील निगडे येथील 60 वर्षीय महिला., चाफळ येथील 6 वर्षीय बालक., जाधववाडी येथील 2 वर्षीय बालिका व 25 वर्षीय महिला., नेरले येथील 2 महिला व 63 वर्षीय पुरुष., म्हावशी येथील 40, 26 वर्षीय महिला व 4 वर्षीय बालिका., अंब्रग येथील 58, 27, 29 वर्षीय पुरुष व 50, 25 वर्षीय महिला., मोरगिरी येथील 65 वर्षीय महिला., तारळे येथील 4 वर्षीय बालक.,

वाई तालुक्यातील वाई शहरातील 46 वर्षीय पुरुष व 16, 11 वर्षीय युवक व 36 वर्षीय महिला., कोरोना केअर सेंटर वाई येथील 34, 48 वर्षीय पुरुष., शाहबाग येथील 32, 35, 53 वर्षीय पुरुष., शांतीनगर येथील 45, 15, 42 वर्षीय महिला व 46 वर्षीय पुरुष.,

जावळी तालुक्यातील दुदुस्करवाडी येथील 70 वर्षीय पुरुष.,

सातारा तालुक्यातील सातारा शहरातील सेनगिरी कॉलनी सत्यमनगर येथील 47 वर्षीय पुरुष., मंगळवार पेठेतील 32 वर्षीय पुरुष., लिंब येथील 54 वर्षीय महिला व 5, 2, 9 वर्षीय बालिका व 9, 5 वर्षीय बालक., वर्ये येथील 48 वर्षीय पुरुष., कण्हेर येथील 65 वर्षीय महिला., लक्ष्मी टेकडी येथील 31, 24, 40, 60 वर्षीय महिला व 24, 35 वर्षीय पुरुष.,

खंडाळा तालुक्यातील सुखेड येथील 31 वर्षीय पुरुष., पाडेगाव येथील 84, 14, 42 वर्षीय पुरुष.,
कोरेगाव तालुक्यातील वाठारकिरोली येथील 45 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

464 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 37, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 9, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 3, कोरेगांव 12, वाई येथील 29, शिरवळ-खंडाळा येथील 76, रायगाव येथील 21, पानमळेवाडी येथील 107, मायणी येथील 39, महाबळेश्वर येथील 11, पाटण येथील 43, दहिवडी येथील 12, खावली येथील 3, कृष्णा हॉस्पिटल कराड येथील 62 असे एकूण 464 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेण्यात आले असुन पुणे व कराड येथे तपासणी करीता पाठविण्यात आले असल्याचेही डॉ. गडीकर यांनी सांगितले.

एका कोरोनाबाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू

कराड येथील खाजगी रुग्णालयात अतित ता. सातारा येथील 29 वर्षीय कोरोनाबाधित पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती डॉ. गडीकर यांनी दिली.
घेतलेले एकूण नमुने 31662
एकूण बाधित 5179
घरी सोडण्यात आलेले 2493
मृत्यू 163
उपचारार्थ रुग्ण 2523

Related Stories

सातारा शिक्षण विभागाचा खाजगी शाळांना दणका

Patil_p

राज्यपालांमुळे राष्ट्राला, संविधानाला धोका, राष्ट्रपतींनी चौकशी करावी: मंत्री बच्चू कडू

Abhijeet Shinde

“कसं काय शेलार बरं हाय का?”, भाजप कार्यालयासमोर शिवसेनेची पोस्टरबाजी

Abhijeet Shinde

फत्यापुरच्या युवकाचा कोकणात अपघाती मृत्यू

datta jadhav

मुंबई विमानतळाचे मुख्यालय अहमदाबादला हलवणे हा मोदींचा महाराष्ट्राच्या जनतेला संदेश – सचिन सावंत

Abhijeet Shinde

वंदनगडावर वणवा लागू नये म्हणून आगपट्टा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!