तरुण भारत

आचऱयात सापडला चक्क पाण्यावर तरंगणारा दगड

प्रतिनिधी / आचरा:

मालवण तालुक्यातील आचरा गावच्या समुद्र किनाऱयावर चक्क पाण्यावर तरंगणारा अनोखा दगड सापडला आहे. किनाऱयावर सकाळी फिरण्यासाठी गेलेले स्थानिक मच्छीमार नारायण कुबल यांना पाण्यात तरंगणारा हा दगड सापडला आहे. किनाऱयालगतच्या पाण्यात हा दगड तरंगत किनाऱयावर येताना कुबल यांना आढळला. कुतूहलाने सापडलेला दगड कुबल यांनी आपल्या घरी आणला आहे.

Advertisements

नेहमीप्रमाणे आचरा पिरावाडीतील स्थानिक मच्छीमार नारायण कुबल हे समुद्र किनाऱयावर सकाळी फिरण्यासाठी गेले होते. फिरताना किनाऱयावरील समुद्राच्या पाण्यात एक वस्तू तरंगताना दिसली. कुतूहलापोटी पुढे जाऊन पाहिले असता, दगडसदृश वस्तू पाण्यावर तरंगत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी उचलून बघितले असता, ती वस्तू दगड असल्याने त्यांनी तो दगड पुन्हा पाण्यात टाकला. त्यावेळी तो पुन्हा तरंगू लागल्याने त्यांनी लागलीच तो उचलून आपल्या घरी आणला. सापडलेला दगड सुमारे 5 किलो वजनाचा आणि 1 फूट लांबीचा असा चौरस आकाराचा आहे. समुद्र किनारी फिरताना सापडलेल्या दगडाला माती, शेवाळ लागले होते. दगड कुबल यांनी स्वच्छ करून पुन्हा पाण्यात टाकला असता, दगड पाण्यावर तरंगू लागला. दगड पाण्यात टाकला, की एखादे प्लास्टिक किंवा थर्माकोलप्रमाणे तो पाण्याच्या प्रवाहात तरंगत वाहू लागतो. कुबल हे पारंपरिक मच्छीमार असून त्यांच्या मते हे दगड खोल समुद्रात असण्याची शक्यता आहे. या दगडाबाबत कुबल यांनी इंटरनेटवर सर्च केले असता, श्रीलंकेत रामसेतु बांधण्यासाठी जो दगड वापरण्यात आला, तो दगड याच प्रकारातला असल्याची माहिती मिळाली. अशा प्रकारचे दगड दक्षिण भारतासोबतच श्रीलंका आणि जपान या भागातही आढळत असल्याचे त्यांना नेटच्या माध्यमातून समजले.

हा दगड म्हणजे ‘प्युमायस स्टोन!’

आचरा येथे सापडलेला दगड हा प्युमायस स्टोन (pumice stone) असून ज्यावेळी पाणी आणि लाव्हारस एकत्र येतात, तेव्हा असे दगड तयार होतात. त्याला प्युमायस स्टोन (pumice stone) असे म्हणतात. दगड तयार होताना त्यामध्ये हवा अडकलेली असते. ज्यावेळी तापमान वाढलेले असते, त्यावेळी दगडातील हवा प्रसरण पावते. त्याने हे दगड पाण्यात तरंगतात, अशी माहिती अभ्यासक नागेश दफ्तरदार यांनी दिली.

Related Stories

कोकणात डेल्टा प्लस संसर्गाची तपासणी

Patil_p

कचरा संकलनातून देवगड न. पं.ला 94 हजाराचे उत्पन्न

NIKHIL_N

कोकणातील मंत्री, आमदार काय कामाचे?

Patil_p

जीर्ण वाशिष्ठी पूलप्रश्नी राष्ट्रवादीचा महामार्ग उपविभागाला सवाल

Patil_p

दापोली पंचायत समितीच्या उपसभापतीपदी मनोज भांबीड बिनविरोध

triratna

लांजात ‘सोशल डिस्टंन्सिग’चे उल्लंघन

Patil_p
error: Content is protected !!