तरुण भारत

कोल्हापूर : राधानगरी धरणाचे दोन दरवाजे बंद, ८५ बंधारे पाण्याखाली

राधानागरीतून ४२५६ तर अलमट्टीतून २२०००० क्युसेक विसर्ग सुरू

प्रतिनिधी/कोल्हापूर

चार दिवसांपासून सुरु असलेला पावसाचा जोर काही अंशी ओसरला. मात्र जिह्यातील पूरस्थिती कायम आहे. महापुरामुळे जिह्यातील 1 राज्यमहामार्ग, 10 राज्यमार्ग आणि 29 प्रमुख जिल्हा मार्ग अद्याप बंदच आहेत. जिह्यातील 23 गावांमधील 1878 कुटूंबातील 5 हजार 561 लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर केले आहे. मात्र सध्या राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे बंद झाल्याने पूरपरिस्थिती नियंत्रणात आहे. काल धरणाचे चार दरवाजे खुले झाले होते. यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली होती.

Advertisements

जिल्ह्यातील राधानगरी धरणाचे ३ व ६ क्रमांकाचे स्वयंचलित दरवाजे आज बंद करण्यात आले आहेत. राधानगरी धरणात २३६.७९ दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी ७ वा. च्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून १४०० व सांडव्यातून २८५६ असा एकूण ४२५६ तर अलमट्टी धरणातून २२०००० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे . जांबरे मध्यम प्रकल्प व जंगमहट्टी मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला आहे.

पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रूई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ , भोगावती नदीवरील- शिरगाव, राशिवडे, हळदी, खडक कोगे, सरकारी कोगे व तारळे. तुळशी नदीवरील बी, आरे. कासारी नदीवरील- कुंभेवाडी, कांटे, करंजफेण, पेंडाखळे, बाजारभोगाव, वालोली, पुनाळ तिरपण, ठाणे आवळे व यवलुज, कुंभी नदीवरील- शेणवडे, मांडुकली, सांगरूळ, कळे व वेतवडे . धामणी नदीवरील- सुळे, आंबडे, पनोरे. वारणा नदीवरील -चिंचोली, माणगाव, कोडोली, खोची, तांदूळवाडी, मांगलेसावर्डे, शिगाव व चावरे. कडवी नदीवरील- सवतेसावर्डे, शिरगांव, सरूडपाटणे, बालूर, भोसलेवाडी, येलूर व कोपार्डे. दुधगंगा नदीवरील -सिध्दनेर्ली, बाचणी, सुळकूड, दत्तवाड, सुळंबी, कसबा वाळवे व तुरंबे वेदगंगा नदीवरील-निळपण, वाघापूर,गारगोटी, म्हसवे, कुरणी, सुरूपली, बस्तवडे व चिखली हिरण्यकेशी नदीवरील-साळगाव, ऐनापूर, गिजवणे, निलजी, हरळी, खणदाळ, देवडे, चांदेवाडी व जरळी . घटप्रभा नदीवरील-पिळणी, बिजूरभोगोली, हिंडगांव गवसे, कानडे सावर्डे, आडकूर, तारेवाडी व कानडेवाडी, ताम्रपर्णी नदीवरील-कुर्तनवाडी, चंदगड, हल्लारवाडी, कोवाड, माणगाव, व कामेवाडी असे एकूण ८५ बंधारे पाण्याखाली आहेत. नजिकच्या कोयना धरणात ७१५.५५ टीएमसी तर अल्लमट्टी धरणात ९४.९९९ इतका पाणीसाठा आहे.

जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणीसाठा

तुळशी ९८.२९ दलघमी, वारणा ९७४.१९ दलघमी, दूधगंगा ७१९.१२ दलघमी, कासारी ७८.५७ दलघमी, कडवी ७१.२२ दलघमी, कुंभी ७६.८३४ दलघमी, पाटगाव १०५.२४ दलघमी, चिकोत्रा ४३.११५ दलघमी, चित्री ५३.२९ दलघमी, जंगमहट्टी ३४.६५ दलघमी, घटप्रभा ४४.१७ दलघमी, जांबरे २३.२३ दलघमी, कोदे (ल पा) ६.०६ दलघमी असा आहे.

बंधाऱ्यांची पाणी पातळी

राजाराम ४४.८ फूट, सुर्वे ४१.८ फूट, रुई ७१.६ फूट, इचलकरंजी ६६.६ फूट, तेरवाड ५८ फूट, शिरोळ ५४.३ फूट, नृसिंहवाडी ५३.९ फूट, राजापूर ४२.३ फूट तर नजीकच्या सांगली २२.७९ फूट व अंकली २९.६ फूट अशी आहे.

Related Stories

पन्हाळा पाणी प्रश्न सुटता सुटेना

Abhijeet Shinde

राधानगरीच्या आलीशा कांबळेचे कुस्तीत कांस्यपदक

Sumit Tambekar

परजिल्ह्यातून, परराज्यातून आटपाडीत आलेल्या 11 लोकांवर गुन्हा

Abhijeet Shinde

वेतवडे येथील विद्यार्थ्यांनी 11 कि.मी. धावत दिला महिला सबलीकरणाचा संदेश

Abhijeet Shinde

दुचाकी व कंटेनर अपघातात नरवेली येथील विद्यार्थी गंभीर जखमी

tarunbharat

मिरजेत सामुहीक नमाज पठण, 41 जण ताब्यात, 15 जणांची धींड, व्हॅाटस्अ‍ॅपवर मॅसेज देऊन बोलाविले

Abhijeet Shinde
error: Content is protected !!