तरुण भारत

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांसाठी इतके बेड आरक्षित

सेवा न देणाऱ्या रुग्णालयांवर होणार कारवाई

प्रतिनिधी / कोल्हापूर

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखणेसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कोल्हापूर जिल्हयातील ग्रामीण व नागरी भागाकरिता ( कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्र वगळून ) रूग्णालय अधिसुचित करण्याबाबत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आदेश जारी केला असून, या आदेशान्वये जिल्ह्याच्या बारा तालुक्यातील ६९४ रुग्णालयातील ७७९६ बेड कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी आरक्षीत केले आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा,१८९७ मधील तरतुदीच्या अंमलबजावणीसाठी अधिसूचना निर्गमित करणेत आलेली आहे.

आणि त्याबाबतची नियमावली प्रसिध्द केली असून आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील तरतूदीप्रमाणे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष , जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण , कोल्हापूर हे कोणतीही आपत्ती रोखणेसाठी किंवा आपत्ती विरुध्द प्रतिबंधात्मक उपाययोजना करणेसाठी सक्षम प्राधिकारी म्हणून काम करीत आहेत. या अनुषंगाने त्यांनी जिल्हयातील ग्रामीण व नागरी भागातील मुंबई नर्सिंग होम अॅक्ट १९४९ नुसार नोंदणी केलेल्या ६९४ आरोग्य संस्था ( रूग्णालये ) त्यांच्या ९७४३ ( खाटा ) बेड असून त्यांच्या ८० टक्के ७७९६ बेड सह तसेच संपूर्ण वैद्यकिय उपचारासाठी निगडीत असलेले तज्ञ डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ व इतर अत्यावश्यक जीवरक्षक प्रणालीसह आपल्या आदेशात अधिसुचित केल आहेत.

सदर शासन अधिसुचनेतील सर्व अटी व शर्ती संबधित आरोग्य संस्थेवर बंधनकारक असुन त्यांनी उपरोक्त निर्देशाचे पालन न केल्यास संबधिताविरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५, साथरोग अधिनियम १८९७ आणि भा.दं.सं. १८६० च्या कलम १८८ नुसार दंडनिय कायदेशीर कारवाई करणेत येईल व या करिता तालुका आरोग्य अधिकारी यांना अधिकार प्रदान करण्यात येत असल्याचे व सदरची अधिसुचना दि. ३१ ऑगस्ट रोजी पर्यन्त कार्यरत राहील असे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी काढलेल्या आदेशात स्पष्ट नमूद केले आहे.

Advertisements

Related Stories

घरावर दगडफेक करत जमावाची महिलांना मारहाण

Patil_p

महाराष्ट्रात मागील 24 तासात 6,863 नवे कोरोनाबाधित; 123 मृत्यू

Rohan_P

कोरोनाच्या दुसऱया लाटेत अनेक जिल्हय़ांत रक्ताचा तुटवडा

Abhijeet Shinde

महाराष्ट्रात पुन्हा नवीन निर्बंध लागू ; सोमवारपासून सर्व जिल्हे तिसऱ्या टप्प्याच्या वरच!

Abhijeet Shinde

हातकलंगलेमधील कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आलेल्या 30 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह

Abhijeet Shinde

आणि बुकिंग होतयं फुल्ल

Patil_p
error: Content is protected !!