तरुण भारत

सातारा जिल्ह्यात 122 नागरिकांना आज डिस्चार्ज; 465 नमुने पाठविले तपासणीला

प्रतिनिधी / सातारा

सातारा : जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 122 नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले, तर 465 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तर 4 कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये जावळी तालुक्यातील 15, कराड तालुक्यातील 74, खटाव तालुक्यातील 1, कोरेगाव तालुक्यातील 1, माण तालुक्यातील 2, पाटण तालुक्यातील 7, सातारा तालुक्यातील 17, वाई तालुक्यातील 5 नागरिकांचा समावेश आहे.

465 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 45, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 9, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 43, कोरेगांव 15, वाई येथील 38, शिरवळ-खंडाळा येथील 78, रायगाव येथील 11, पानमळेवाडी येथील 36, मायणी येथील 20, महाबळेश्वर येथील 14, पाटण येथील 19, खावली येथील 30, कृष्णा हॉस्पिटल कराड येथील 107 असे एकूण 465 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेण्यात आले असुन पुणे व कराड येथे तपासणी करीता पाठविण्यात आले असल्याचेही डॉ. गडीकर यांनी सांगितले.

4 कोरोनाबाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू

सातारा येथील खाजगी रुग्णालयात पांढरवाडी ता. खटाव येथील 74 वर्षीय पुरुष, रामदास कॉलनी फलटण येथील 74 वर्षीय पुरुष, वाघोशी ता. खंडाळा येथील 60 वर्षीय पुरुष, जकातवाडी ता. सातारा 48 वर्षीय पुरुष अशा चार कोरोनाबाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

घेतलेले एकूण नमुने 32127
एकूण बाधित 5378
घरी सोडण्यात आलेले 2615
मृत्यू 171
उपचारार्थ रुग्ण 2592

Related Stories

सोशल डिस्टन्स ठेवुन नातेवाईकांच्या साक्षीने बांधली लगीनगाठ

Patil_p

सातारा पोलीस दलात अधिकाऱ्यांची खांदेपालट

Abhijeet Shinde

सातारा : जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणार्‍या योद्यांचे कार्य आदर्शवत – आ. शिवेंद्रसिंहराजे

Abhijeet Shinde

सरकारी यंत्रणांवर ताण आहे हे मान्य पण… : राज ठाकरे

Rohan_P

गोकुळ शिरगाव तालुका करवीर येथे आत्महत्या

Abhijeet Shinde

शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर

Abhijeet Shinde
error: Content is protected !!