तरुण भारत

गणेश विसर्जन तळ्याच्या क्रेन आणि कागद टाकण्याची मागवली निविदा

गणेश उत्सवाची एक ही बैठक नाही

प्रतिनिधी/ सातारा

Advertisements

यावर्षी कोरोनामुळे गणेशोत्सव होईल का नाही याची शक्यता आहे.असे असतानाच सातारा शहरात दरवर्षीचा विसर्जनाचा प्रश्न ऐरणीवर येण्याची शक्यता गृहीत धरून पालिका प्रशासनाने विसर्जन तळ्याच्या ठिकाणी क्रेन पुरवणे आणि तळ्यात प्लास्टिक कागद टाकणे या कामाच्या निविदा मागवण्यात आली आहे.निविदा 17 तारखे पर्यंत भरण्याची अंतिम मुदत आहे.दरम्यान, गणेशोत्सवाच्या अनुषंगाने एक ही बैठक झाली नसल्याने तसेच सर्वसाधारण सभेत चर्चा झाली नसल्याने अचानक काढण्यात आलेल्या या कामाची चर्चा सुरू आहे.

सातारा शहरात दरवर्षीच गणेश विसर्जनाचा प्रश्न उपस्थित होतो.गेल्या काही वर्षांपासून कृत्रिम तळे खोदणे आणि बुजवून टाकण्याचा कार्यक्रम व्हायचा.त्याकरिता पालिकेचे लाखो रुपये कामी यायचे.गेल्या दोन वर्षांपासून करंजे येथे कृत्रिम तळे खोदले आहे.जिल्हाधिकारी यांच्याशी खासदार उदयनराजे यांनी चर्चा करून तो मार्ग निवडला गेला.यावर्षी कोरोना आल्याने गेल्या चार महिन्यात कसलीही सातारा पालिकेची बैठक झाली नाही.पालिकेने गणेशोत्सवाच्या अनुषंगाने बैठक घ्यावी अशी मागणी होत होती.परंतु त्यावर कार्यवाही न होता, पालिकेने शुक्रवारी चर्चा करून गणेश विसर्जन तळ्यात कागद टाकण्याचे काम 7 लाख 6 हजार545 रुपयांचे तर क्रेन पुरवण्याचे काम 3 लाख 50 हजाराचे आहे.या दोन्ही कामाकरता ई निविदा मागवण्यात आली आहे.ही निविदा विक्री सुरू झाली आहे.दि.17पर्यंत मुदत असून दि.19रोजी 11 वाजल्यानंतर ही निविदा उघडण्यात येणार आहे.या मागणी करण्यात आलेल्या कामाची कसलीच माहिती बांधकाम सभापती मिलिंद काकडे यांना नाही असे समजते.दरम्यान, यावरून सातारा पालिकेत बैठक घेतली गेली नसल्याने अचानक निविदा मागणी केल्याने भाजपचे आणि नगरविकास आघाडीचे नगरसेवक या प्रश्नी सत्ताधायांना कोंडीत पकडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Related Stories

कोल्हापूर शहरात गुरुवारी आढळले नवीन 142 कोरोना रुग्ण

Abhijeet Shinde

चिंताजनक : महाराष्ट्रात 17,864 नवे बाधित; 87 मृत्यू

Rohan_P

शहीद श्रीमंत काळंगे अनंतात विलीन

datta jadhav

ऑनलाइन गीत वाचन स्पर्धेत गजानन वाईकर सातारा जिल्ह्यात प्रथम

Abhijeet Shinde

पंतप्रधानांचे डॉक्टरांना योगावर अभ्यास करण्याचे आवाहन

Abhijeet Shinde

देशी दारुचे दुकान फोडून 57 हजार लंपास

Patil_p
error: Content is protected !!