तरुण भारत

कुलभूषण जाधवांवरील सुनावणीसाठी पाकमध्ये वरिष्ठ पिठाची स्थापना

ऑनलाईन टीम / इस्लामाबाद : 

हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानात मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेले माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या खटल्याच्या सुनावणीसाठी पाकिस्तानमध्ये वरिष्ठ पिठाची स्थापना करण्यात आली आहे. भारताच्या दबावामुळे पाकिस्तानने या वरिष्ठ पिठाची स्थापना केली आहे. 

Advertisements

इस्लामाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अथर मिनल्हा यांच्या अध्यक्षतेखाली या वरिष्ठ पिठाची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये न्या. अमर फारुख आणि न्या. मिलान गुल हसन औरंगजेब यांचा समावेश समावेश आहे.  3 सप्टेंबर रोजी कुलभूषण यांच्या खटल्याची या पिठापुढे सुनावणी होणार आहे. 

कुलभूषण यांना भारतीय दूतावासाचे सहाय्य उपलब्ध व्हावे, यासाठी भारताकडून सातत्याने पाकिस्तानवर दबाव टाकण्यात येत होता. त्यामुळे पाकिस्तानने या वरिष्ठ पिठाची स्थापना केली आहे. तसेच कुलभूषण यांच्यासाठी भारताकडून वकील नियुक्‍त करण्यात यावा, यासाठी इम्रान खान सरकारने भारताशी संपर्क केला आहे.

दरम्यान, मागील आठवड्यात कुलभूषण जाधव यांच्या खटल्यामध्ये इस्लामाबाद सर्वोच्च न्यायालयाने तीन ज्येष्ठ वकिलांची न्यायमूर्ती मित्र म्हणून नियुक्ती केली आहे. पाकिस्तानी सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील अबीद हसन मंटो, हमीद खान व पाकिस्तानचे माजी ॲटर्नी जनरल मकदूम अली खान या तिघांची कायदेशीर मदतीसाठी न्यायमित्र म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Related Stories

सर्वात मोठे तोंड असणारी महिला

Patil_p

अमेरिका : सिनसिनाटी शहरात गोळीबार; 8 ठार

datta jadhav

जामताडाच्या ठकसेनांवर अमेरिकेचे संशोधन

Patil_p

लेबननच्या पंतप्रधानांसह सर्व मंत्र्यांचा राजीनामा, सरकार पायउतार

datta jadhav

अरुणाचल प्रदेश भारताचा नव्हे तिबेटचा भाग; चीनचा दावा

datta jadhav

चीन जगातील सर्वात मोठी नौदल शक्ती

Patil_p
error: Content is protected !!