तरुण भारत

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा कहर, 1014 पॉझिटिव्ह, 12 जणांचा मृत्यू

170 रुग्णांना डिस्चार्ज, शहरात 325 रुग्णांची भर

प्रतिनिधी/कोल्हापूर

Advertisements

जिह्यात कोरोना बाधितांचा आकडय़ाने शनिवारी 10 हजारांचा टप्पा ओलांडला. शुक्रवारी मध्यरात्रीपासून नव्या 1014 उच्चांकी रुग्णांची भर पडल्याने जिह्यातील एकूण रुग्ण संख्या 10 हजार 445 झाली. गेल्या 4 महिन्यातील ही उच्चांकी आकडेवारीअसून जिह्याच्या चिंतेत भर पडली आहे. कोल्हापूर शहरात दिवसभरात 325 रुग्णांची भर पडल्याने शहरात समूह संसर्गाचा धोका वाढला आहे. दरम्यान गेल्या 24 तासामध्ये 12 रुग्णांचा मृत्यू झाला असून 170 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

जिह्यात शनिवारी 1785 नागरीकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 1145 नागरीकांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले. शनिवारी आरटी पीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 2586 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैक 2483 अहवाल निगेटीव्ह आले. यापैकी 49 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले असून 54 अहवाल प्रलंबीत आहेत. तर ऍटिजेन टेस्ट द्वारे घेतलेल्या 595 स्वॅबचे अहवाल प्राप्त झाले. यापैकी 496 अहवाल निगेटीव्ह आले असून 99 अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. खासगी लॅबमध्ये केलेल्या तपासणीपैकी 866 अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. जिह्यात गेल्या 4 महिन्यातील उच्चांकी रुग्ण संख्या आढळली. 1014 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने रुग्ण संख्या 10 हजार 445 वर पोहोचली. सध्या 6 हजार 63 रुग्ण उपचार घेत असून 4 हजार 121 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान आजपर्यंत जिह्यात 261 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान 40 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे.

शनिवारची तालुकानिहाय रुग्ण संख्या

आजरा 11, भुदरगड 8, चंदगड 9, गडहिंग्लज 21, गगनबावडा 1, हातकणंगले 153, कागल 41, करवीर 106, पन्हाळा 35, राधानगरी 12, शाहूवाडी 12, शिरोळ 50, नगरपालीका हद्दीमध्ये 230, कोल्हापूर महापालीका क्षेत्रात 325, अन्य राज्यातील 13 रुग्णांची भर पडली.

दिवसभरात बारा मयत

55 वर्षीय महिला इचलकरंजी

70 पुरुष गोकुळ चौक, इचलकरंजी

83 पुरुष बोने मळा, इचलकरंजी

70 पुरुष जैन बस्ती, इचलकरंजी

68 पुरुष हुपरी

54 पुरुष, अब्दुललाट, शिरोळ

65 पुरुष पेठवडगांव, हातकणंगले

51 पुरुष हुपरी, हातकणंगले

31 महिला कबनुर ता. हातकणंगले

64 पुरुष  नागाळा पार्क कोल्हापूर

62 पुरुष फुलेवाडी कोल्हापूर

63 पुरुष सानेगुरुजी वसाहत कोल्हापूर

शहरात धोका वाढला

   लॉकडाउनच्या काळात शहरात नगण्य असणाऱया कोरोना बाधितांच्या आकडय़ामध्ये आता मात्र झपाटय़ाने वाढ होत आहे. शहरातील पेशंट संख्येत दिवसागणीक 300 नव्या रुग्णांची भर पडत आहे. शुक्रवारी 283 तर शनिवारी 325 नव्या रुग्णांची भर पडली. शहरातील कोरोना बाधितांच्या आकडय़ाने 3 हजारांचा आकडा गाठला आहे. यामुळे शहरामध्ये समूह संसर्गाचा धोका वाढला आहे.

शेंडा पार्क येथील लॅब सुरु

 शेंडा पार्क येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सुक्ष्मजीवशास्त्र विभागात आरटीपीसीआर लॅब आहे. तिचे सॅनिटायझेशन व निर्जंतुकीकरण केल्याने दोन दिवस ही लॅब बंद होती. तेथील चाचणीही बंद करण्यात आली होती. शनिवार पासून ही लॅब सुरु करण्यात आली. नवीन मशीन व कीट आल्याने या प्रयोग शाळेतील चाचणी क्षमता वाढवण्यात आली आहे.

एकूण कोरोनाग्रस्त    10 हजार 445

एकूण कोरोनामुक्त    4 हजार  121

आज अखेर मृत्यू       261

उपचार घेणारे         6 हजार 63

Related Stories

तरूण भारत इफेक्ट : वारणेच्या जिल्हा सिमेवरील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी परवाना प्राप्त

Shankar_P

मेडिकल कॉलेजला जागा हस्तांतरणाचा घेतला आढावा

Patil_p

जिल्हा युवा महोत्सव गुरुवारपासून

triratna

मुरगुड नगरपालिका मुख्याधिकाऱ्यावर चप्पल फेक; पालिका कार्यालयात राडा

triratna

पंतप्रधान कर्ज योजनांच्या नावाने बनावट ऍप्लिकेशन

Patil_p

चौके परिसरात सलग दुसऱ्या दिवशीही कोरोना रुग्ण

triratna
error: Content is protected !!