तरुण भारत

सातारा : काही दिवसापूर्वीच ‘ते’ झाले क्वारंटाइन, चोरट्यांच्या तिजोरीवर डल्ला

प्रतिनिधी/सातारा

येथील लक्ष्मी टेकडी परिसरात पाच दिवसांपूर्वी बापू कारंडे हे क्वारंटाईन झाले होते. घर बंद असलेला याचाच फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी कारंडे यांचे बंद घर फोडून सुमारे दीड लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना घडली. या घटनेची नोंद सातारा शहर पोलिसात झाली असून पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, सदर बाजार येथील बापू कारंडे हे मोलमजुरी करतात. ते गेल्या पाच दिवसापासून क्वारंटाईन झाले आहेत. त्यांचे बंद घराचे दार चोरट्याने फोडून घरातल्या कपाटात ठेवलेले रोख 15 हजार रुपये, साडे चार तोळ्यांचे गठन, अर्ध्या तोळ्यांची सोन्याची साखळी असा ऐवज चोरून नेला. याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस तपास करत आहेत.

Related Stories

ॲड. बनकर आरोग्याची माळ कोणाच्या गळ्यात घालणार?

datta jadhav

‘कोरोनाचं संकट दूर होऊ दे’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे विघ्नहर्त्याला साकडे

Abhijeet Shinde

पुलवामा हल्ल्यातील ‘त्या’ वीर योद्ध्याची पत्नी सैन्यात दाखल

Abhijeet Shinde

युट्युबवरील त्या व्हिडिओप्रकरणी अंनिसने पोलिसांत केली तक्रार

Abhijeet Shinde

नगरपालिकेच्या निवडणूका राष्ट्रवादी स्वबळावर लढवणार

Patil_p

जुना बुधवार पेठेतील खासगी सावकरावर धाड

Abhijeet Shinde
error: Content is protected !!