तरुण भारत

जोधपूरमध्ये एकाच कुटुंबातील 11 पाकिस्तानी शरणागतींचा मृत्यू

ऑनलाईन टीम / जोधपूर : 

राजस्थानच्या जोधपूरमध्ये एकाच कुटुंबातील 11 पाकिस्तानी शरणागतींचे मृतदेह आढळून आले आहेत. विषारी वायूगळतीमुळे हे मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. देचू पोलिसांनी हे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. 

Advertisements

मृतांमध्ये 7 महिला आणि 4 पुरुषांचा समावेश आहे. मृत सर्वजण पाकिस्तानातून विस्थापित होऊन भारतात दाखल झाले होते. अचलावता नावाच्या गावात शेतीचं काम करून आपला उदरनिर्वाह करत होते. मृतांच्या कुटुंबात 12 जण राहत होते. त्यामधील एक जण रात्री शेतात झोपायला गेला होता, तो बचावला आहे. 

शेतात झोपण्यासाठी गेलेला सदस्य सकाळी घरी आल्यावर त्याला घरातील सगळे निपचित पडल्याचे आढळले. त्यानंतर त्याने पोलिसांना याची माहिती दिली. 

Related Stories

मुलांवरील लसीचे परीक्षण रोखण्यास नकार

Patil_p

भारतात मागील 24 तासात सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद

datta jadhav

आंदोलनांसाठी सार्वजनिक जागांवर कब्जा अयोग्य

Omkar B

देशात कोरोनाबाधितांची संख्या 70 हजारांवर

datta jadhav

माझे क्षेत्र, माझे नियम

Patil_p

इस्लामाबादमधील भारतीय दूतावासात आढळला ड्रोन

datta jadhav
error: Content is protected !!