तरुण भारत

हलशी आरोग्य केंद्रात कोरोनाबाधित महिलेची यशस्वी प्रसूती

प्रतिनिधी खानापूर

खानापूर तालुक्यात आतापर्यंत 5 गरोदर महिलांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी चार कोरोनाबाधित महिलांची खानापूरच्या सरकारी दवाखान्यात यशस्वीपणे प्रसूती करण्यात आली. हलशी प्राथमिक आरोग्य केंद्रात कमीत कमी सोयी असतानाही डॉ. मंजुनाथ दळवाई यांच्या मार्गदर्शनाखाली नर्स राणी लखनगौडा यांनी कोरोनाबाधित महिलेची यशस्वी प्रसूती केली. संपूर्ण बेळगाव जिल्हय़ात कोरोनाबाधित झालेल्या गरोदर महिलेची यशस्वी प्रसूती करणारे हलशी येथील पहिले प्राथमिक आरोग्य केंद्र ठरले आहे. बाळंतीण महिला व बाळही सुखरुप असून याबद्दल हलशी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर व नर्सचे विशेष कौतुक केले जात आहे.

Advertisements

Related Stories

सोमय्यांसाठीचा जिल्हा बंदी आदेश रद्द

Abhijeet Shinde

आत्मा म्हणजे मन नव्हे

Patil_p

राजा ऋत्विक भारताचा 70 वा ग्रॅण्ड मास्टर

Patil_p

रत्नागिरी जिल्हय़ात आणखी आठ दिवस कडक लॉकडाऊन

Patil_p

आजचे भविष्य शनिवार दि. 7 ऑगस्ट 2021

Patil_p

कर्नाटक: मागणी वाढल्याने राज्यात ऑक्सिजनची कमतरता

Abhijeet Shinde
error: Content is protected !!