तरुण भारत

कोरोना बाधित हॉकीपटूंच्या प्रकृतीत सुधारणा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतीय पुरूष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रित सिंग व अन्य चार हॉकीपटूंना कोरोनाची बाधा झाली असल्याची बातमी साईने शनिवारी प्रसिद्ध केली होती. बेंगळूरमधील साईच्या केंद्रामध्ये या कोरोना बाधीत हॉकीपटूंवर डॉक्टरी इलाज सुरू असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे साईच्या वरिष्ठ अधिकाऱयांने सांगितले.

Advertisements

गेल्या शुक्रवारी कर्णधार मनप्रित सिंगची कोरोना चांचणी घेण्यात आली. त्यावेळी तो या चांचणीत पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. बेंगळूरच्या साई केंद्रामध्ये दोन डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनातर्फे डॉक्टर अविनाश यांच्याकडे साईची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मनप्रित सिंग, सुरेंद्रकुमार, जेसकरण सिंग, वरूणकुमार आणि कृष्णन पाठक या कोरोना बाधीत हॉकीपटूंवर सध्या साईच्या केंद्रामध्ये वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

Related Stories

ब्रिस्बेन स्पर्धेतून शरापोव्हाचे पुनरागमन

Patil_p

विनोद कुमारचा निकाल रोखला

Patil_p

सानिया मिर्झा-झेंग यांचे आव्हान समाप्त

Patil_p

सुवर्णपदकाच्या लढतीत दहिया रौप्यजेता!

Amit Kulkarni

आयएसएलचे चार खेळाडू कोरोनामुक्त

tarunbharat

भारतीय टेबल टेनिसपटूकडून निराशा

Patil_p
error: Content is protected !!