तरुण भारत

बसवेश्वर चौक ते डाक बंगल्यापर्यंत एका बाजूचा रस्ता बंद

प्रतिनिधी/ बेळगाव

गोवावेस येथील बसवेश्वर चौक ते डाक बंगल्यापर्यंतच्या दुसऱया बाजुचा रस्ता रविवारपासून वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. सदर रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम करण्यात येणार असून, सध्या पाईप घालण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे एकाच बाजुच्या रस्त्यावरून वाहतुक वळविण्यात आली आहे.

Advertisements

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत बसवेश्वर चौक ते बॅ. नाथ पै चौक पर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. त्याकरिता रस्त्याच्या दुतर्फा गटारीकरिता पाईप घालण्याचे काम सुरू आहे. पण बसवेश्वर चौक ते डाक बंगल्यापर्यंत महापालिका व्यापारी संकुलासमोरील रस्त्याचे काँक्रिटीकरण यापूर्वी करण्यात आले आहे. दुसऱया बाजुचे काँक्रिटीकरण करण्यास सुरू करण्यात आले आहे. सांडपाणी वाहण्यासाठी पाईप घालण्याचे काम रविवारी सकाळपासून हाती घेण्यात आले आहे. त्याकरिता हा रस्ता वाहतुकीकरीता बंद ठेवण्यात आला होता. रविवारी सकाळपासून काम सुरू करण्यात आल्याने या मार्गावरील वाहतुक एकाच बाजुने वळविण्यात आली आहे. कॉक्रिटीकरणाचे काम पूर्ण होईपर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.

डाक बंगला ते बॅ. नाथ पै चौक पर्यंतच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाबाबत अद्याप कोणत्याच हालचाली सुरू नाहीत. हा रस्ता पूर्णपणे खराब झाला असून, हिंदवाडी कॉर्नर, आनंदवाडी पी. के. क्वॉटर्स परिसरात रस्त्यावर मोठ मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. पावसाचे पाणी साचत असल्याने वाहनधारकांना धोका निर्माण झाला आहे. काँक्रिटीकरणाचे काम हाती घेईपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची गरज आहे. मात्र स्मार्ट रोड करण्यात येणार असल्याचे सांगून याकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. पण याचा फटका नागरिकांना सोसावा लागत आहे. हाती घेण्यात आलेली काँक्रिटीकरणाची कामे तातडीने पूर्ण करून वाहतुकीसाठी रस्ते मोकळे करावेत अशी मागणी होत आहे.

Related Stories

11 वी ज्युनियर मास्टर दिव्यांग शरीरसौष्ठव स्पर्धा मार्चमध्ये

Amit Kulkarni

रोटरी क्लब ऑफ बेळगाव सेंट्रलतर्फे कोरोना योद्धय़ांचा सत्कार

Amit Kulkarni

रमेश कत्ती यांच्या वाढदिनी विविध उपक्रम

Omkar B

सिंधुदुर्ग मल्टिपर्पज सोसायटीची वार्षिक सभा खेळीमेळीत

Omkar B

परदेशात नोकरी देण्याच्या बहाण्याने ‘फसविण्याचे अड्डे’

Amit Kulkarni

एनसीसी छात्रांना सरकारी नोकरीमध्ये आरक्षण द्या

Patil_p
error: Content is protected !!