तरुण भारत

रावण येथील नागरिक रस्त्यावर

कंटेनमेंट झोन मुक्त केल्याचे सरकारकडून अद्याप जाहीर नाही, कामगारांना कामावर घेण्यास खासगी कंपन्यांचा नकार, दुधाची पंधरा दिवसापासून नाशाडी

प्रतिनिधी /वाळपई

 सत्तरी तालुक्मयातील केरी पंचायत क्षेत्रातील रावण गावात कोविड रुग्ण सापडल्यानंतर सदर गाव कंटेनमेंट झोन मुक्त केल्यासंबंधी अधिकृत माहिती नसल्यामुळे काल रविवारी आक्रमक झालेले नागरिक रस्त्यावर उतरले.

 सरकारच्या निष्काजीपणामुळे गावातील नागरिकांना त्रास सहन करावा लागला असून आतापर्यंत मोठय़ा प्रमाणात दुधाची नाशाडी सहन करावी लागली आहे. खासगी कंपनीमध्ये काम करणाऱया कर्मचाऱयांना सरकारकडून देण्यात येणार असलेले अधिकृत पत्र उपलब्ध न झाल्यामुळे त्यांना कामावर रुजू होता येत नाही, अशा प्रकारच्या तक्रारी या ग्रामस्थांनी केलेल्या आहेत. सरकारने ही समस्या लवकरात लवकर सोडवावी, अशी मागणी केली आहे.

  याबाबतची माहिती अशी की, केरी पंचायत क्षेत्रातील रावण गावांमध्ये एक महिन्यापूर्वी 13 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून सरकारने गावाच्या सीमा सीलबंद केल्या होत्या. यामुळे गावातील सरकारी व खासगी कामगारांना कामावर जाता आले नाही. त्याचप्रमाणे दूध उत्पादकांना दूधाचा पुरवठा संबंधित एजन्सीकडे करता आला नाही. दोन दिवसांपूर्वी सीलबंद पेलेले नाके उघडण्यात आलेले आहे. यामुळे खाजगी कामगारांनी कंपनीत जाऊन कामावर रुजू होण्यासाठी तयारी दर्शविली. मात्र कंपन्यांनी जोपर्यंत तुमचा गाव कंटेनमेंट झोनपासून मुक्त झाल्याचे अधिकृत पत्र मिळत नाही तोपर्यंत कामावर रुजू करून घेणार नसल्याचे व्यवस्थापनाने स्पष्ट केले.

  यासंदर्भात अनेक कामगारांनी स्थानिक मामलेदार व उपजिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधला, मात्र त्यांच्याकडून पत्र देण्यास टाळाटाळ होत असल्याचे कामगार वर्गाचे म्हणणे आहे. याबाबत मिथून गावस यांनी गेल्या अनेक दिवसांपासून खासगी कंपन्यातील कामगारांना मुद्दामपणे रजेवर राहावे लागले असून नुकसान होत असल्याचे स्पष्ट केले.

  गावातील आणखी एक नागरिक कुशल गावस, मनोहर रामा गावस यांनी सरकारच्या या निष्काळजीपणाचा संताप व्यक्त केला आहे. कायदेशीर पद्धतीने यासंबंधी निर्बंध लावण्यात आले असते तर अशा प्रकारची समस्या निर्माण झाली नसती असे त्यांनी स्पष्ट केले. गावातील प्रगतशील दूध उत्पादक तामसो मोर्लेकर यांनी गेल्या जवळपास वीस दिवसापासून या गावातील अनेक दूध उत्पादकांच्या दुधाची नाशाडी होत असल्याचे सांगितले.

  सरकारने कंटेनमेंट झोनसंबंधी कायदेशीर पद्धतीने निर्णय न घेतल्याचे स्थानिक पंचायत सभासद सत्यवान गावस यांनी स्पष्ट केले. हा गाव कंटेनमेंट झोन  करताना कोणत्या पद्धतीने केला व तो मागे कशा पद्धतीने घेतला याबाबतचे स्पष्टीकरण सरकारने द्यावे. नागरिकांना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत असून आपल्यावरही नागरिकांकडून दबाव येत आहे. सरकारने शक्मय तेवढय़ा लवकर या गावाचा प्रश्न निकालात काढावा, अशी मागणी गावस यांनी केली आहे.

Related Stories

निलेश काब्रालांचा अखिल भारतीय वकील मंचाकडून निषेध

Patil_p

लोकमान्य मल्टिपर्पज को ऑपरेटिव्ह सोसायटी हरमल शाखेतर्फे शिक्षकांचा सत्कार

Amit Kulkarni

निदान मतदारसंघातिल खाण अवलंबिता वर मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे।

Patil_p

खाणबंदी, म्हादई विषयात पेंद्राने हस्तक्षेप करावा

Patil_p

डिचोलीतील बायपास रस्ता सुशोभिकरणाचे आज उदघाटन

Amit Kulkarni

चक्रीवादळामुळे सत्तरीत सुमारे दहा लाखांचे नुकसान

Omkar B
error: Content is protected !!