तरुण भारत

तिसंगीत रानभाजी महोत्सवाचे उदघाटन

वार्ताहर / साळवण

आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी आहारात रानभाजांचा वापर करुन निसर्गाच्या या मौल्यवान ठेव्याचे जतन व संवर्धन करायला हवे , असे प्रतिपादन गगनबावडा पंचायत समिती सभापती संगिता पाटील यांनी केले. त्या तिसंगी येथे गगनबावडा तालुका कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित रानभाजी महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी बोलत होत्या. अध्यक्षस्थानी सरपंच बंकट थोडगे उपस्थित होते.
यावेळी रानभाजी महोत्सवाचे उदघाटन सभापती संगिता पाटील यांच्या हस्ते तर रानभाजा स्टॉलचे उदघाटन शालाबाई सणगर यांच्या हस्ते करण्यात आले. तिसंगी येथील जोतिर्लिंग मंदिरामध्ये रानभाजी महोत्सव भरविण्यात आला. यामध्ये औषधी गूणधर्म असणाऱ्या तसेच लोप पावत जाणाऱ्या विविध प्रकारच्या रानभाजांची मांडणी करण्यात आली.

Advertisements

रानभाजांची माहिती असणारे व त्यांचे जतन व संवर्धन करणाऱ्या शालाबाई सणगर व बापू जाधव यांनी रानभाजांची माहिती देऊन त्यांचे आहारातील महत्त्व पटवून दिले. रानभाजी महोत्सवामध्ये सहभागी झालेल्या बचत गटांच्या महिला व इतर मान्यवरांना प्रमाणपत्रांचे वाटप सभापती संगिता पाटील व तालुका कृषी अधिकारी गजानन खाडे यांच्या हस्ते करण्यात आले.

महोत्सव उदघाटनप्रसंगी सभापती संगिता पाटील,सरपंच बंकट थोडगे,तालुका कृषी अधिकारी गजानन खाडे,शालाबाई सणगर,ग्रा.प.सदस्य सदाशिव भिके,पोलिस पाटील प्रार्थना सोनार,बापू जाधव,विनायक सणगर,कृषी सहाय्यक जी.एस.कांबळे, एस.आर.सातपूते,विनायक सणगर,हरिश देशपांडे,एम.टी.नलवडे,शहाजी बळीप,विक्रम कार्वेकर,शुभांगी देसाई,सुरेखा तिसंगीकर,प्रियांका साळोखे आदीसह बचत गटाच्या महिला व ग्रामस्थ उपस्थित होते. सुत्रसंचालन कृषी सहाय्यक एस.डी.पाटील यांनी केले तर आभार सर्जेराव खाडे यांनी मानले.

Related Stories

ध्वजारोहण सोहळय़ात संचलन, सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे रंगत

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्ह्यात दुपारी दोनपर्यंत १४४ पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

विषमुक्त अन्न खाण्यासाठी देशी वाणांची जोपासना करणे अत्यावश्यक

Sumit Tambekar

कोल्हापूर : अब्दुललाट येथे ग्रामपंचायतीच्या दारातच लावला कचऱ्याचा ढीग

Abhijeet Shinde

औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांना कोरोनाची लागण

Rohan_P

अरबी समुद्रात 14 ते 15 मेच्या आसपास चक्रीवादळ येण्याची शक्यता ; किनारपट्टीवरील राज्यांना सतर्कतेचा इशारा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!