तरुण भारत

पेडणे तालुक्मयात दिवसभरात 15 कोरोना रुग्ण

एकूण 148 आकडा झाला , सक्रीय रुग्ण 63

प्रतिनिधी / पेडणे

पेडणे तालुक्मयात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेन दिवस वाढत असून ही चिंतेची बाब झाली आहे.

    पेडणे तालुक्मयात रविवारी  दिवसभरात 15 कोरोना रुग्ण मिळाले आहे . सर्वाना कोरोना सेंटरमध्ये उपचारासाठी नेले . आतापर्यंत तालुक्मयात एकूण 148 रुग्णांचा आकडा झाला आहे . त्यातील अधिकाधिक कोरोना सकारात्मक हे  ठणठणीत होवून घरी परतले . यापूर्वीच मांदे पंचायत क्षेत्रातील 9 वझरीचे 18 वारखंडचे   , 13 रुग्ण , हसापुर 1 बरे होवून घरी परतले आहे , वारखंड मध्ये आता नवीन दोन रुग्ण मिळाल्याने 2 सक्रीय आहेत . एकूण पेडणे तालुक्मयात 63  रुग्ण सक्रीय आहेत . दिवसभरात पालये 2 , पार्से 4 , हरमल 3 , वारखंड 2 , कासरवर्णे  1 , धारगळ 1 व कोरगाव 2 मिळून 15 कोरोना रुग्णांचा आकडा झाला .

  पेडणे तालुक्मयात हळू हळू रुग्णांचा आकडा वाढत आहे . आता पर्यंत कासार्वारणे 1 , न्हयबाग 1 , उगवे 1 , पार्से 12 वझरी 18 , वारखंड 15 , मांदे 9 , पालये 10 , कोरगाव 18 , पेडणे 8 ,   विर्नोडा 7 , हरमल 10 , हसापुर 1 , धारगळ 14 ,तुये 11 ताम्बोसे 3 , तालारण 3 , चोपडे 6 व मालपे 1 मिळून एकूण 148 आकडा झाला .

  पेडणे तालुक्मयात ज्या ज्या ठिकाणी कोरोना रुग्णाचा अहवाल सकारात्मक येतो त्या ठिकाणी त्याच्या घर परिसराचे निर्जंतुकिकरण पेडणे अग्नी शामन दलाचे जवान करत असतात .शिवाय दर शनिवारी पत्रादेवी नाक्मयावर फवारणी केली जाते  सरकारकडून पूर्ण तालुक्मयात जनजागृती ,कलाकार तियात्रिस्त प्रदीप नाईक यांचा सहभाग.

  पेडणे तालुक्मयात कोविड 19 विषयी कोणकोणती खबरदारी घ्यावी यासाठी खास शैलीत कला आणि सांस्कृतिक खात्याचे अधिकारी आणि गोमंतकीय सुप्रसिद्ध  अभिनेते तियात्रिस्त प्रदीप नाईक यांनी पेडणे तालुक्मयातील एकूण वीस ग्रामपंचायती व एक पेडणे नगरपालिका क्षेत्रात जबरदस्त जनजागृती केली . त्याना पेडणे मामलेदार कार्यालयातील कर्मचारी रामदास दावरे , दामोदर मोरजकर  यांनी सहकार्य केले.

  कलाकार प्रदीप नाईक यांनी सात दिवस पेडणे तालुक्मयात आपल्या कालाविष्कारातून जनजागृती केली . कोरोनापासून मुक्ती मिळवण्यासाठी कामानिमित्ताने घरातून बाहेर पडताना तोंडाला मास्क घालणे , सॕनिटायझार किवा शाबणाने स्वछ हात धुणे , गर्दीत जाणे टाळणे , सामाजिक सुरक्षित अंतर राखणे , खोकला ताप आला असेल तर नजीकच्या आरोग्य केंद्रात तपासणी करावी ,अशा  विविध प्रकारच्या नियमाची माहिती आणि जागृती अधिकारी प्रदीप नाईक यांनी केली .

  सुरुवातीला कोरोना रुग्ण पेडणेत सापडले  तेव्हा मामलेदार कार्यालयाचे कर्मचारी रामदास दावरे यांनी वाहनाद्वारे ध्वनी यंत्राद्वारे जनजागृती केली होती .

Related Stories

गोव्यातील सात अधिकारी आयएएस पॅडरमध्ये बढती

Amit Kulkarni

विलास मेथर खूनप्रकरणी संतोष पिल्लई गजाआड

Patil_p

मेळावली आयआयटीचे सीमांकन सुरु

Omkar B

कोविड निगा केंद्राला विरोध राजकीय प्रेरणेनेच !

Omkar B

खोडये सत्तरी येथे हरणाला जीवदान

Omkar B

दाबोळी विमानतळावर देशी पर्यटकांचा ओघ

Patil_p
error: Content is protected !!