तरुण भारत

चेन्नईतील 697 टन अमोनियम नायट्रेटचा ई-लिलाव

ऑनलाईन टीम / चेन्नई : 

बैरुतमध्ये अमोनियम नायट्रेटमुळे झालेल्या भीषण स्फोटाचा बोध घेत चेन्नई शहरातील एका गोदामात असलेल्या 697 टन अमोनियम नायट्रेटचा ई-लिलाव करण्यात आला. हा स्फोटक केमिकलचा साठा आता हैदराबादला पाठवण्यात येत आहे. 

Advertisements

कस्टम विभागाने 2015 साली एका आयातदाराकडूनहा अमोनियम नायट्रेटचा साठा जप्त केला होता. चेन्नईपासून 20 किमी अंतरावर असलेल्या फ्राईट स्टेशनमध्ये अमोनियम नायट्रेट भरलेले कार्गो ठेवण्यात आले होते. हा केमिकलचा साठा ज्या ठिकाणी ठेवण्यात आला होता, त्याच्या जवळपास 12 हजार लोकांची वस्ती होती. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही बाब चिंताजनक होती. 

बैरुतमधील स्फोटानंतर प्रशासनाला जाग आली असून, चेन्नईतील 697 टन अमोनियम नायट्रेटचा ई-लिलाव करण्यात आला. यातील काही कंटेनर हैदराबादला रवाना झाले आहेत. 

Related Stories

अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला सेनेगलमध्ये अटक

tarunbharat

अफगाणिस्तानवर सर्वपक्षीय बैठक होणार

Patil_p

अँटिलिया प्रकरणात एनआयएकडून दोन जणांना अटक

Abhijeet Shinde

भाजपकडून ‘मोलकरणी’ला उमेदवारी

Patil_p

गुणवत्तेच्या आधारावर सैन्यप्रमुखांची नियुक्ती?

Patil_p

बेंगळूरमध्ये वाढदिवस कार्यक्रमात स्फोट

Patil_p
error: Content is protected !!