तरुण भारत

मंत्री विश्वजीत कदम यांच्या कुटुंबातील तिघांना कोरोनाची लागण

सांगली / प्रतिनिधी

काँग्रेसचे युवा नेते डॉ.जितेश कदम (भैय्या ) यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना भारती हॉस्पिटल पुणे येथे उपचारासाठी दाखल केले आहे. त्यांची प्रकृती ठणठणीत आहे अशी माहिती राज्य मंत्री विश्वजीत कदम यांनी फेसबुक पोस्ट द्वारे दिली आहे. तसेच मंत्री कदम यांचे चुलते एच एम कदम आणि त्यांच्या पत्नीही पॉझिटिव्ह आहेत त्यांच्या वर ही उपचार सुरू आहेत. ते लवकरच कोरोनावर मात करून घरी परत येतील असे त्यांनी सांगितले.

दरम्यान डॉ.जितेश (भैय्या) कदम यांनी त्यांच्या फेसबुक पेजवरून स्वतः ही माहीती दिली आहे. तसेच निकटच्या संपर्कातील कार्यकर्त्यांनी स्वतः विलगिकरण करून घ्यावे. लक्षणे दिसत असतील तर कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन डॉ.जितेश (भैय्या) कदम यांनी केले आहे.

Advertisements

Related Stories

कर्जाचा बोजा उतरवण्यासाठी बनावट कागदपत्रे

Patil_p

”मोदींनी जगाला दिलेली शिकवण आधी स्वत: अंमलात आणावी”

Abhijeet Shinde

विधानपरिषदेच्या 12 सदस्यांच्या नावाची यादी राज्यपालांकडेच; सुनावणी दरम्यान उघड

Abhijeet Shinde

खासदार संजय मंडलिक यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट

Abhijeet Shinde

सांगली : तमाशा कलावंत अनिल खाडेंचे दुःखद निधन

Abhijeet Shinde

शरद पवारांनी बोलवली राष्ट्रवादी नेत्यांची बैठक

Abhijeet Shinde
error: Content is protected !!