तरुण भारत

अभिनेता संजय दत्तला रुग्णालयातून डिस्चार्ज

ऑनलाईन टीम / मुंबई : 


बॉलीवुड अभिनेता संजय दत्तला आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने 61 वर्षीय संजय दत्तला दोन दिवसांपूर्वी वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 


यापूर्वीच संजय दत्तची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. त्यामुळे त्याला रुग्णालयातील नॉन-कोव्हिड वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र आता प्रकृतीत सुधारणा झाल्याने अवघ्या दोनच दिवसात संजयला रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. 

रुग्णालयातून बाहेर पडताना संजय दत्तला कॅमेऱ्यामध्ये टिपले गेले. यावेळी संजय दत्तने कॅमेऱ्यासमोर आपली प्रकृती आता स्थिर असल्याचे इशारा करत सांगितले. संजय दत्तला रुग्णालयात दाखल केल्यानंतर अनेक चाहत्यांनी तो लवकर ठीक व्हावा यासाठी प्रार्थना केली होती. तसेच काही चाहते तर रुग्णालयाच्या बाहेर जमा देखील झाले होते. 


दरम्यान, संजय दत्तला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले तेव्हा त्याची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. या कोरोना टेस्टचे  रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर हॉस्पिटल मधूनच संजय दत्तने ट्विट करत म्हटले होते की, मी तुम्हाला सांगू इच्छितो की माझी प्रकृती ठीक आहे. मी सध्या वैद्यकीय देखरेखीखाली आहे आणि माझा कोविड चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. लीलावती रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका व कर्मचार्‍यांची मदत आणि शुश्रुषेमुळे मी एक-दोन दिवसांत घरी येईन, शुभेच्छा आणि आशीर्वाद दिल्याबद्दल धन्यवाद!

Related Stories

सत्ता सोडण्यापूर्वी ट्रम्प यांनी दिला चीनला धक्का

datta jadhav

कलाकाराच्या पत्नीची द्विधा मन:स्थिती द आर्टिस्ट वाईफ

Patil_p

दमणमध्ये आता कोरोनाचा शिरकाव

pradnya p

कोरोनाबाधितांची संख्या वाढतीच, मत्यू 800 पार

Patil_p

नमस्कार… कपिल शर्माने दिली गुड न्यूज!

pradnya p

चादूरा कॅम्पमधून एसपीओ बेपत्ता; 2 एके 47 रायफल आणि 3 मॅगझीनही गायब

datta jadhav
error: Content is protected !!