तरुण भारत

अवघी सव्वा महिन्याची असताना मातृछत्र हरपलेल्या तेजस्वीचे यश

अजय गडेकर / आडेली:

अवघी सव्वा महिन्याची असताना मातृछत्र हरपलेल्या व त्यानंतर आत्ये व आजीच्या माया ममतेत वाढलेल्या आडेली देऊळवाडी येथील तेजस्वी बाबाजी धर्णे  हिने अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतही जिद्द व चिकाटीच्या जोरावर दहावीत 85 टक्के एवढे ‘तेजस्वी’ यश संपादन केले. तिला आता कॉमर्स शाखेत प्रवेश घेऊन बँकिंग क्षेत्रात करिअर करायचे आहे.

Advertisements

आडेली-देऊळवाडी येथील रहिवासी असलेल्या तेजस्वीचे मातृछत्र ती अवघी सव्वा महिन्याची असताना हरपले. त्यानंतर तिचे पालनपोषण तिची आत्ये आत्ये कल्याणी रामचंद्र धर्णे हिने केले. भावाच्या घरीच राहाणाऱया या आत्येने तेजस्वी हिला आईची माया दिली. तेजस्वीच्या घरी वडील, मोठा भाऊ, आत्ये व आजी असे कुटुंब आहे. घरची थोडीफार शेती असल्याने तेजस्वीचे वडील शेती व मोलमजुरी करतात. मोठा भाऊ घरीच असतो. वडिलांच्या मोलमजुरीवरच संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. घरच्या गरीब परिस्थितीमुळे तीला खासगी शिकवण्या करता आल्या नाहीत. घरी आत्येला घरकामात व सुट्टीच्या दिवशी वडिलांना शेतीकामात मदत करत तिने हे यश मिळविले.

कृषीरत्न काकासाहेब चमणकर हायस्कूलची विद्यार्थिनी असलेल्या तेजस्वी हिला यापूर्वी आठवीची शिष्यवृत्ती प्राप्त झाली होती.  शिक्षणाबरोबरच खेळातही तिने प्राविण्य मिळविले होते. खो-खो, कॅरम, रिले, कबड्डी, डस्टबॉल आदी क्रीडा स्पर्धातही तिने तालुका व जिल्हा पातळीवरील बक्षिसे मिळविली आहेत. आजही वडील, आजीबरोबर ती भातशेतीत मदत करते. बालवयात आईच्या प्रेम, सहवासाला मुकलेली तेजस्वी हिने घरातील सर्व कामे करून फावल्या वेळेत शाळेचा अभ्यास करून दहावीत यश मिळविले.

Related Stories

युवासेनेची बजाज फायनान्सच्या कार्यालयावर धडक

Patil_p

दापोली-पाळंदे समुद्रात 8 पर्यटक बुडाले

Patil_p

कणकवलीत उड्डाणपुलावरील रस्ता खचला

Ganeshprasad Gogate

बांबूला मिळाला एसटीचा आधार

NIKHIL_N

भोस्तेतील क्रिकेट स्पर्धेत सुरज नाईन संघ विजेता

Patil_p

नवीन कुर्ली वसाहत येथे गरजूंना जीवनावश्यक वस्तू

NIKHIL_N
error: Content is protected !!