तरुण भारत

गावठी दारू अड्डय़ावर छापे

हुल्यानूर-हलग्याजवळ कारवाई

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

बेळगाव तालुक्यातील गावठी दारू अड्डय़ांवर छापे टाकण्यात आले आहेत. हुल्यानूर परिसरातील एक व हलगा परिसरातील दोन अड्डे अधिकाऱयांनी उद्ध्वस्त केले आहेत.

गेल्या चार दिवसांपासून अबकारी विभागाचे जयरामेगौडा एम. बी., रवी मुरगोड, सी. एस. पाटील, लिंगराज व त्यांच्या सहकाऱयांनी कारवाई सुरू ठेवली आहे. यासंबंधी तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून तीन अड्डे अधिकाऱयांनी उद्ध्वस्त केले आहेत.

31 ठिकाणी कारवाई करण्यात आली असून 175 लिटर गुळाचे रसायन, दहा लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली आहे. एकीकडे गावठी दारू अड्डय़ांवर छापे टाकण्याबरोबरच गावठी दारूच्या दुष्परिणामाविषयी जागृती करण्यात येत असल्याचे अबकारी अधिकाऱयांनी सांगितले.

Related Stories

ग्रामीण आमदारांच्या पीएंची ता.पं.फंडात ढवळाढवळ

Amit Kulkarni

होनगा मार्कंडेय पुलाच्या सर्व्हिस रोडवर कचरा

Amit Kulkarni

पहिले रेल्वेगेट येथे दुपदरीकरणाच्या कामाला पुन्हा सुरुवात

Patil_p

बस बंद असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय

Omkar B

कंग्राळीतील शर्यतीत सिद्धेश्वर प्रसन्न राजहंसगड बैलजोडी प्रथम

Amit Kulkarni

फिट इंडियासाठी धावले जवान

Patil_p
error: Content is protected !!