तरुण भारत

भाच्यावर गोळीबार करणाऱया मामाला अटक

काकती पोलिसांची कलखांबजवळ कारवाई, बंदूक जप्त

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

दोन दिवसांपूर्वी जमीन वादातून आंबेवाडी येथे भाच्यावर गोळीबार करून त्याच्या खुनाचा प्रयत्न करणाऱया मामाला काकती पोलिसांनी अटक केली आहे. कलखांबजवळ ही कारवाई करण्यात आली असून त्याच्याजवळून बंदूक जप्त करण्यात आली आहे.

खाचू मोनिंग तरळे (वय 43) रा. आंबेवाडी असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. बेळगाव ग्रामीणचे एसीपी के. शिवारेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली काकतीचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र हळ्ळूर व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे.

8 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता आंबेवाडी येथे अमित बाबुराव पावले व त्याची पत्नी नीता अमित पावले या दोघा जणांवर हल्ला करून त्यांच्यावर सिंगल बॅरल बंदुकीने गोळय़ा झाडण्यात आल्या होत्या. यासंबंधी काकती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला होता.

पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, पोलीस उपायुक्त सीमा लाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास हाती घेतला असून रविवारी दुपारी कलखांबजवळ खाचूला अटक करण्यात आली आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करून या युवकाला न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आले. न्यायालयाच्या आदेशावरून त्याची रवानगी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली.

Related Stories

कंग्राळी बुद्रुकमधील गटारींचे सीडी वर्क काम अर्धवट

Amit Kulkarni

अयोध्यानगरमध्ये डेनेजचे पाणी रस्त्यावर

Amit Kulkarni

पत्नीसह मेहुणीवर कोयत्याने वार, बार्शीत एकावर गुन्हा दाखल

Abhijeet Shinde

शिल्लक कामे 28 जानेवारीपर्यंत पूर्ण न केल्यास अधिकाऱयांचे निलंबन

Patil_p

चंदन तस्कर प्रकरणातील संशयिताला जामीन

Patil_p

कर्नाटक: हुबळी तहसील कार्यालयाच्या वतीने विशेष वॉर रूमची स्थापना

Abhijeet Shinde
error: Content is protected !!