तरुण भारत

‘त्या’ तरुणाच्या खून प्रकरणी एफआयआर दाखल

8 ते 9 जणांनी खून केल्याचा उल्लेख, आरोपींचा शोध जारी

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

मुचंडी, ता. बेळगाव येथील तरुणाच्या खून प्रकरणी रविवारी टिळकवाडी पोलीस स्थानकात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 8 ते 9 जणांनी या तरुणाचा खून केल्याचे फिर्यादीत उल्लेख आहे. टिळकवाडी पोलिसांनी तपास हाती घेतला असून गुन्हेगारांचा शोध घेण्यात येत आहे.

महेश महादेव अवणी (वय 27) रा. हनुमान चौक, मुचंडी असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. 24 जुलै रोजी सायंकाळी 7.15 वाजण्याच्या सुमारास अनगोळ येथील आमराई परिसरात 8 ते 10 जणांनी महेशवर हल्ला करून त्याचा खून केला आहे. खुनानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी अपघातात त्याचा मृत्यू झाल्याचे भासविण्यात आले.

मारिहाळ पोलीस स्थानकात अपघाताचे प्रकरणही दाखल झाले. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना धमकावण्यात आले. खुनाची वाच्यता केली तर तुमचीही खैर नाही, असे धमकावण्यात आले होते, अशी माहिती पोलीस तपासात उघडकीस आली आहे. महेशवर हल्ला झाला त्यावेळी त्याचा मामा प्रकाश पाटील (रा. सांबरा) हाही त्याच्यासोबत होता.

मारेकऱयांनी प्रकाशलाही धमकावल्याची माहिती मिळाली असून 8 ते 10 जणांनी लाथाबुक्क्मयांनी व स्टम्पने महेशवर हल्ला केला आहे, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. यासंबंधी भादंवि 143, 147, 148, 302, 201, 506, सहकलम 149 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक विनायक बडीगेर पुढील तपास करीत आहेत.

Related Stories

निवडणूक जाहिरातींवर लक्ष देण्याची जिल्हाधिकाऱयांची सूचना माहिती-प्रसारण विभागाला दिली भेट

Omkar B

डुआथ्लॉन स्पर्धेत विक्रांत, विनायक, सृष्टी, मेघ, गुलझार, मुबारक, श्रेया, संतोष विजेते

Patil_p

एस. जी. बाळेकुंद्री इन्स्टिटय़ूटतर्फे उद्या गानसिंचन कार्यक्रम

Patil_p

सांबरा क्रिकेट स्पर्धेत पंतबाळेकुंद्री संघ विजेता

Amit Kulkarni

लोको पायलटच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला

Amit Kulkarni

साखर आयुक्तांकडून एफआरपी दर जाहीर

Patil_p
error: Content is protected !!