तरुण भारत

इंडोनेशियात ज्वालामुखी जागृत

दोन किलोमीटरच्या उंचीपर्यंत पसरली राख

जकार्ता  

Advertisements

सुमारे वर्षभरापर्यंत निद्रिस्त राहिल्यावर इंडोनेशियातील माउंट सिनाबुंग ज्वालामुखी पुन्हा जागृत झाला आहे. उत्तर सुमात्राच्या कारो येथील या ज्वालामुखीतून बाहेर पडणाऱया राखेमुळे दोन किलोमीटर उंचीच्या धूराचे विशाल लोट दिसून येत आहेत. ज्वालामुखीतून बाहेर पडणारी राख 30 किलोमीटर अंतरावरील बेरास्तगीपर्यंत पोहोचली आहे. या भागातून जाणाऱया प्रवासी विमानांना सतर्क करण्यात आले आहे. 

इंडोनेशियाच्या अधिकाऱयांनी पर्यटक आणि स्थानिक लोकंना या ज्वालामुखीच्या 3 किलोमीटर कक्षेपासून दूर राहण्यास सांगितले आहे. हा ज्वालामुखी अजून राख बाहेर टाकू शकतो, अशी भीती असल्याने प्रशासन सतर्क आहे. ज्वालामुखी विस्फोटामुळे जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

Related Stories

नाटय़मय घडामोडींमुळे निकालाची उत्कंठा

Patil_p

आयसीयू कर्मचारीवर्ग तणावात

Patil_p

ColdZyme 20 मिनिटांत करणार 98.3 टक्के कोरोना विषाणू नष्ट

datta jadhav

ब्रिटननिर्मित लसीची लवकरच घोषणा शक्मय

Patil_p

अफगाणिस्तान संघर्षात 34 जणांचा मृत्यू

Omkar B

चिनी लष्कराच्या पश्चिम विभाग प्रमुखपदी झँग शुडाँग

datta jadhav
error: Content is protected !!