तरुण भारत

पहिल्या लसीची घोषणा करण्यास रशिया सज्ज

मॉस्को / वृत्तसंस्था

कोरोना विषाणूवरील जगातील पहिल्या वहिल्या लसीची घोषणा करण्यास रशिया सज्ज झाला आहे. कदाचित ही घोषणा पुढील आठवडय़ामध्येच होऊ शकते. या लसीची सर्व परीक्षणे पूर्ण झाली असून परिणाम समाधानकारक आहे. कोरोनावरचा पहिला उपचार मिळण्यासंबंधी आशावादी वातावरण निर्माण झाले आहे.

Advertisements

रशियाच्या स्पुटनिक न्यूज एजन्सी या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली. रशियाच्या गामालेया संशोधन केंद्राने रशियाच्या संरक्षण विभागाच्या साहाय्याने या लसीची निर्मिती केली आहे. 12 ऑगस्टला या लसीची नोंद करण्यात येईल आणि त्यानंतर तिच्या उत्पादनाला प्रारंभ करण्यात येईल. अशा लसीची नोंद करणारा रशिया हा जगातील पहिला देश ठरणार आहे.

प्रथिनाचा उपयोग

या लसीत सार्सवर उपयोगी ठरणाऱया प्रथिनाचा उपयोग करण्यात आला आहे. या लसीमुळे कोरोना विषाणूचा प्रतिकार करण्याची पेशींची शक्ती वाढते. त्यामुळे कोरोनाचे विषाणू शरिरात शिरले तरी त्यांना निष्प्रभ करण्यात पेशी यशस्वी ठरतात. या लसीची तिसऱया टप्प्यातील मानवी परीक्षणेही यशस्वी ठरल्याचे रशियाने घोषित केले आहे. जग आतुरतेने या लसीची वाट पहात आहे.

Related Stories

मेक्सिकोत गोळीबार; 10 जणांचा मृत्यू

Patil_p

पाकवर ‘एफएटीएफ’ची वक्रदृष्टी कायम

Patil_p

कोरोना उगमस्रोताच्या चौकशीसाठी WHO चे पथक वुहानमध्ये

datta jadhav

एचआयव्ही प्रतिजैविके आढळल्याने लसीवर प्रयोग बंद

Patil_p

कोरोना लसनिर्मितीत रशियाची बाजी

Patil_p

8 हजार जम्बो जेट्सची आवश्यकता

Patil_p
error: Content is protected !!