तरुण भारत

मनदीप सिंग सहावा कोरोना बाधित हॉकीपटू

वृत्तसंस्था/ बेंगळूर

येथील भारतीय क्रीडा प्राधिकरण मंडळाच्या (साई) क्रीडा संकुलात भारतीय हॉकीपटूंसाठी राष्ट्रीय सराव शिबीर 20 ऑगस्टपासून सुरू केले जाणार आहे. या शिबिरात दाखल होणाऱया हॉकीपटूमध्ये आतापर्यंत सहा हॉकीपटूंना कोरोनाची बाधा झाली आहे. कोरोना चांचणीत मनदीप सिंग पॉझिटिव्ह असल्याचे साईच्या वरिष्ठ अधिकाऱयाने सांगितले.

Advertisements

आतापर्यंत कर्णधार मनप्रित सिंग, सुरेंद्रकुमार, जेसकरण सिंग, वरूणकुमार, गोलरक्षक कृष्णन पाठक आणि मनदीप सिंग, असे सहा हॉकीपटू कोरोना बाधीत आढळले आहेत. साईच्या केंद्रामध्ये भारतीय हॉकी संघातील खेळाडूंची कोरोना चांचणी घेण्यात आली. या सर्व हॉकीपटूमध्ये कोरोनाची लक्षणे किरकोळ असल्याची साईच्या डॉक्टरांनी सांगितले. या सर्व हॉकीपटूंना एका बंदीस्त निवासस्थानामध्ये ठेवण्यात आले आहे. 20 ऑगस्टपासून सुरू होणाऱया सराव शिबिरापूर्वी सर्व हॉकीपटूंना विशिष्ट कालावधीसाठी क्वॉरेंटाईनमध्ये ठेवण्यात येणार आहे. भारतामध्ये कोरोनाचा प्रसार वाढत असून आतापर्यंत सुमारे 22 लाख लोकांना याची लागण झाली असून सुमारे 45 हजार लोकांचे बळी पडले आहेत.

Related Stories

राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय हॉकी संघांचा सहभाग अनिश्चित

Patil_p

मल्ल रवी दाहियाला रौप्यपदक

Amit Kulkarni

रोहित प्ले ऑफमध्ये दाखल, पिंकी उपांत्य फेरीत

Patil_p

टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या विस्ताराची योजना

Patil_p

विनेश फोगटच्या ढोपरावर शस्त्रक्रिया

Patil_p

विश्वचषक स्टेज-1 तिरंदाजी स्पर्धा आजपासून

Patil_p
error: Content is protected !!