तरुण भारत

आयपीएल टायटल स्पॉन्सरशीपसाठी ‘पतंजली’ इछुक

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

आगामी आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या टायटल स्पॉन्सरशीपसाठी बाबा रामदेव यांच्या मालकीच्या पतंजली उद्योग समुहाने प्रयत्न सुरू केल्याची माहिती या समुहातील एका वरिष्ठ अधिकाऱयाने दिली.

Advertisements

भारत आणि चीन यांच्यातील राजकीय संबंध अधिक ताणले गेल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी चीनच्या भारतात आयात होणाऱया विविध वस्तूंवर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे चीनची विव्हो ही कंपनी अडचणीत आली. आयपीएल स्पर्धेचे टायटल स्पॉन्सरशीपचे हक्क विव्होला मिळाले होते पण या उद्योग समुहावर बंदी घातल्याने आयपीएलचे टायटल स्पॉन्सरशीपची जागा रिकामी राहिली आहे. आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत हरीद्वारच्या बाबा रामदेव यांच्या मालकीच्या पतंजली आयुर्वेद कंपनीने चांगलेचे बाळसे धरले आहे. आयपीएल स्पर्धेच्या टायटल स्पॉन्सशीपसाठी पंतजली इच्छुक असल्याचे समजते. गेल्याच आठवडय़ात बीसीसीआयने विव्होच्या आयपीएलच्या टायटल स्पॉन्सशीरशीप रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. 2020 ची आयपीएल क्रिकेट स्पर्धा 19 सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिरातमध्ये सुरू होणार आहे. या स्पर्धेच्या टायटल स्पॉन्सशीपसाठी 14 ऑगस्टपर्यंत इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. यापूर्वी विव्हो कंपनीने आयपीएल टायटल स्पॉन्सशीपसाठी 2018 ते 2022 या पाच वर्षांच्या कालावधीकरिता 2190 कोटी रूपये मोजले होते.

Related Stories

पाकची झिम्बाब्वेवर 6 गडय़ांनी मात

Patil_p

सीएसकेच्या चाहत्यांना आठवतोय सुरेश रैना!

Patil_p

इंग्लंड 4 बाद 192

Patil_p

महिलांच्या तिरंगी मालिकेसाठी ईसीबी प्रयत्नशील

Patil_p

यू-19 विश्वचषक : भारत-जपान लढत आज

Patil_p

प्रज्नेशला उपविजेतेपद

Omkar B
error: Content is protected !!