तरुण भारत

शान मसूद मानांकनात 19 व्या स्थानावर

वृत्तसंस्था/ दुबई

आयसीसीच्या ताज्या कसोटी फलंदाजांच्या मानांकनात पाकचा सलामीचा फलंदाज शान मसूदने 19 वे स्थान मिळविले आहे. इंग्लंड विरूद्ध झालेल्या पहिल्या कसोटीत शान मसूदने शानदार दीडशतक झळकविले होते. त्याचप्रमाणे इंग्लंडच्या ख्रिस वोक्सचे मानांकनातील स्थान 18 अंकांनी वधारले आहे. या पहिल्या कसोटीत वोक्सची 84 धावांची खेळी इंग्लंडला विजय मिळवून देणारी ठरली.

Advertisements

या पहिल्या कसोटीत पाकच्या डावखुऱया शान मसूदने 156 धावांची खेळी केली होती. या कामगिरीमुळे त्याचे स्थान 14 अंकांनी वधारले. आता तो 19 व्या स्थानावर आहे. पाकचा बाबर आझम सध्या सहाव्या स्थानावर आहे. इंग्लंडच्या वोक्सने या मानांकन यादीत 78 वे स्थान मिळविले आहे. इंग्लंडचा बटलर 30 व्या तर पॉप 36 व्या स्थानावर आहे.

आयसीसीच्या कसोटी गोलंदाजांच्या ताज्या मानांकन यादीत पाकचा यासीर शहा 22 व्या स्थानावर आहे. इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत त्याने 8 गडी बाद केले होते. पाकचा शदाब खान 69 व्या स्थानावर आहे. आयसीसीच्या सांघिक कसोटी मानांकनात इंग्लंड सध्या 266 गणांसह तिसऱया तर ऑस्ट्रेलिया 236 गुणांसह दुसऱया स्थानावर आहे. भारत 360 गुणांसह पहिल्या तर न्यूझीलंड 180 गुणांसह चौथ्या आणि पाक 140 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.

Related Stories

झुंजार पंत, लढवय्या गिल…कांगारुंची बत्ती गुल!

Patil_p

वरिष्ठांची राष्ट्रीय महिला हॉकी स्पर्धा केरळमध्ये

Patil_p

चीनमधील सहा फुटबॉलपटूंवर बंदी

Patil_p

यंदाचा टी-20 वर्ल्डकप 17 ऑक्टोबरपासून युएईत, 14 नोव्हेंबरला फायनल

Amit Kulkarni

मिल्खा सिंग यांना पत्नीवियोग

Patil_p

कर्णधार रानी रामपालसह सात महिला हॉकीपटू कोरोना बाधित

Patil_p
error: Content is protected !!