तरुण भारत

चीनने सैनिकांना टोचली कोरोना प्रतिबंधक लस

ऑनलाईन टीम / बीजिंग : 

‘कॅनसियो’ लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचे निकष येण्यापूर्वीच चीनने आपल्या सैनिकांना ही कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यास सुरुवात केली आहे. 

Advertisements

‘कॅनसियो’ ही कोरोना प्रतिबंधक लस चिनी लष्कराच्या मदतीने बनवण्यात आली आहे. ही लस तयार करण्यात चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचा मोठा वाटा आहे. विशेष म्हणजे या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू असून, त्याला मान्यताही मिळाली नाही. तरी देखील चीन लष्करातील सैन्याला सरसकट ही लस देत आहे.

चीनी सैनिकांमध्ये रोगप्रतिकारशक्ती आणि जैविक शक्ती चांगली असल्याने त्यांना दोन टप्प्यातील चाचणी झालेली लस देण्यात येत असल्याचे चीनचे पॉलीसी सेंटरचे संचालक ॲडम नी यांनी म्हटले आहे. चिनी सैन्याच्या मेडिकल सायन्स प्रमुख चेन वेई यांनी ‘कॅनसियो’ ही लस विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 

Related Stories

पाकिस्तान अन् तुर्कस्तानला चांगलेच सुनावले

Amit Kulkarni

एलईटी, जैश अन् पाक सैन्यामुळेच सरशी

Patil_p

मेक्सिकोत कोरोनाबळींची संख्या 95 हजारांवर

datta jadhav

चिनच्या वुहानमध्ये पुन्हा संसर्ग

Patil_p

इस्रायलच्या हल्ल्यात 22 पॅलेस्टिनींचा मृत्यू

Patil_p

पाकिस्तानातच शिजला 26/11 हल्ल्याचा कट

Omkar B
error: Content is protected !!