तरुण भारत

सातारा जिल्ह्यात 15 ऑगस्टला कलम 144 लागू

मिठाई पदार्थांचे उत्पादन, विक्री व वाटप करण्यास मनाई

प्रतिनिधी/सातारा

15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात येणार आहे. या दिनाचे औचित्य साधुन सर्वत्र मिठाईचे, खासकरुन जिलेबीचे वाटप केले जाते. या कार्यक्रमाच्या दिवशी जिलेबीच्या कारणास्तव नागरिक एकत्र येवून मोठ्या प्रमाणावर कोरोना विषाणूचा संसर्ग होवुन, सार्वजनिक आरोग्य धोक्यात तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवून सार्वजनिक शांतता व सुरक्षिततेस बाधा उत्पन्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

यासाठी जिल्हादंडाधिकारी, शेखर सिंह यांनी सातारा जिल्ह्यामध्ये कोणत्याही सार्वजनिक तसेच घरगुती ठिकाणी जिलेबी, मिठाई पदार्थांचे उत्पादन तसेच विक्री व वाटप करण्यास क्रिमीनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 प्राप्त असलेल्या अधिकारानुसार मनाई केली आहे.

Advertisements

Related Stories

सुरुपलीचे जॅकवेल जमिनदोस्त; ३० लाखाचे नुकसान

Abhijeet Shinde

कोल्हापूर : शिरोळ परिसरात डेंग्यू, चिकनगुनियाचे थैमान

Abhijeet Shinde

साताऱ्यातील उच्चशिक्षित महिलेकडून बनावट नोटांसह 83 हजारांचा मुद्देमाल जप्त

Abhijeet Shinde

पन्हाळ्याचा मुख्य रस्ता पुन्हा खचला

Abhijeet Shinde

इगतपुरीतील रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा, ‘बिग बॉस’ फेम महिलेसह 22 जणांचा समावेश

Abhijeet Shinde

विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर आज कोल्हापुरात

Abhijeet Shinde
error: Content is protected !!