तरुण भारत

विदेशी संघांचे न्यूझीलंड दौरे निश्चित

वृत्तसंस्था/ ऑकलंड

येत्या उन्हाळी मोसमात पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश आणि विंडीजचे संघ न्यूझीलंडचा दौरा करणार आहेत. या चारही देशांच्या क्रिकेट संघटनांनी या दौऱयाला अधिकृत होकार दिल्याची माहिती क्रिकेट न्यूझीलंडचे सीईओ डेव्हिड व्हाईट यांनी दिली.

Advertisements

येत्या फेब्रुवारी महिन्यात ऑस्ट्रेलियाचा महिला क्रिकेट संघ न्यूझीलंडचा दौरा करणार असून या दौऱयामध्ये पाच वनडे आणि तीन टी-20 सामने खेळविण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. पाक, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश आणि विंडीज क्रिकेट मंडळानी या आगामी दौऱयांना अधिकृत होकार दिल्याची माहिती व्हाईट यांनी दिली. न्यूझीलंडचा संघ विंडीज आणि पाक संघाबरोबर कसोटी आणि टी-20 मालिका खेळणार आहे. दरम्यान बांगलादेशचा संघ न्यूझीलंडबरोबर वनडे आणि टी-20 मालिका खेळेल. या मालिकेनंतर ऑस्ट्रेलियन संघ न्यूझीलंडविरूद्ध टी-20 मालिका खेळणार आहे. कोरोना समस्या न्यूझीलंडमध्ये आटोक्यात आली असून गेल्या 100 दिवसांच्या कालावधीत संपूर्ण देशात एकही कोरोना बाधित रूग्ण आढळलेला नाही.

Related Stories

ऑस्ट्रेलिया संघ बांगलादेश दौऱयावर जाण्याची शक्यता

Patil_p

कोरोनामुळे इंडिया ओपन आणि सैयद मोदी इंटरनॅशनल टूर्नामेंट रद्द

Rohan_P

बांगला टायगर्सचा वॉरियर्सवर 5 गडय़ांनी विजय

Patil_p

दुबईतील सामन्यांच्या निकालाचा परिणाम

Patil_p

हरभजन सिंगची आयपीएल स्पर्धेतून माघार

Patil_p

आरसीबी बनला प्लेऑफमधील तिसरा संघ

Patil_p
error: Content is protected !!