तरुण भारत

बेंगळूरमध्ये काँग्रेस आमदाराच्या घरावर जमावाचा हल्ला; 2 ठार

60 पोलीस जखमी, शहरात कलम 144 लागू 

ऑनलाईन टीम / बेंगळूर : 

Advertisements

सोशल मीडियावर बदनामीकारक पोस्ट शेअर केल्यामुळे संतप्त जमावाने काँग्रेसचे आमदार श्रीनिवास मूर्तींच्या घरावर हल्ला करत तोडफोड केली. त्यावेळी घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांवरही जमावाने भ्याड हल्ला केला. दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला. या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला. तर जमावाच्या हल्ल्यात 60 पोलीस जखमी झाले आहेत. मंगळवारी रात्री ही घटना घडली.

याप्रकरणी पोलिसांनी 110 जणांना अटक केली आहे. तसेच बेंगळूर शहरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. वादग्रस्त पोस्ट शेअर करणाऱ्या आमदार मूर्तींच्या भाच्यालाही पोलिसांनी अटक केली आहे.

आमदार श्रीनिवास मूर्तींच्या भाच्याने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका बदनामीकारक पोस्टमुळे हा हिंसाचार उसळला. जमावाने आमदारांच्या घराची तोडफोड करत त्यांच्या गाड्याही जाळल्या. जमावाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या पोलिसांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर डीजे हाल्ली आणि केजी हाल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीत कर्फ्यू लावण्यात आला आहे.

Related Stories

बीडमध्ये ४०० जणांनी बलात्कार केल्याचा पीडित मुलीचा आरोप

Abhijeet Shinde

परमबीर सिंह यांच्या घराबाहेर फरार असल्याची नोटीस

datta jadhav

काश्मिरी पंडित आणि भाजपाशी संबंधित २०० नागरिकांच्या हत्येसाठी पाकिस्तानमध्ये ISI ची बैठक

Abhijeet Shinde

यावर्षी होणार ५ कंपन्यांचे खासगीकरण

Amit Kulkarni

आरोग्य सेतू ऍप सुरक्षितच

Patil_p

पंतप्रधान मोदींकडून ‘स्वामित्व’ योजनेला सुरुवात

datta jadhav
error: Content is protected !!