तरुण भारत

राजस्थानमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 55 हजार पार

ऑनलाईन टीम / जयपूर : 


राजस्थानमध्ये आज सकाळी 10.30 वाजेपर्यंत 10 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात मृतांची एकूण संख्या 821 इतकी झाली आहे. तर सकाळपर्यंत 595 नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे आतापर्यंत राजस्थानमधील कोरोना बाधिताची एकूण संख्या 55 हजार 482 वर पोहचली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. 

Advertisements


अधिकाऱ्यांनी सांगितले की, 10 मृतांमध्ये दऊसा मधील 1, जलोरे 3, कोटा 2, पाली 2 आणि टोंक मधील दोन जणांचा समावेश आहे. आज 159 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आत्तापर्यंत 40 हजार 558 जणांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, सध्या राज्यात 55,482 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 


आज आढळलेल्या रुग्णांमध्ये अजमेर 56, बारमेर 8,  बिलवरा 33, बिकानेर 115, बुंदी 74, चितोरगर 17, ढोलपुर 107,  डुंगरपूर 1, झुंझूंन 17, जोधपूर 96, नागौर 28, आणि उदयपूर मधील 38 जणांचा समावेश आहे. 

Related Stories

सूर्य नमस्काराला मुस्लीम लॉड बोर्डाचा विरोध

Patil_p

सुप्रिया सुळेंचं महाविकास आघाडी सरकारसंदर्भात भाकीत; म्हणाल्या…

Abhijeet Shinde

महाराष्ट्रात 4 हजारपेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त!

Rohan_P

देशात मागील 24 तासात 2.76 लाख नवे रुग्ण; मृतांच्या संख्येत किंचित घट

Rohan_P

संयुक्त राष्ट्रसंघात भारताचा मोठा विजय

Patil_p

अमेरिकेच्या सुचनेनुसार चेन्नईत हेलिकॉप्टर जप्त

Patil_p
error: Content is protected !!