तरुण भारत

पेठ वडगावात बारा कोरोना रुग्णांची भर, रुग्णांची संख्या ६८

पेठ वडगाव/प्रतिनिधी :

पेठ वडगाव शहरात आज बारा कोरोना बाधितांची भर पडली. यामुळे कोरोना रुग्णांची संख्या ६८ झाली आहे. शहरात एका कोरोना बाधीताच्या संपर्कातील एकाच घरातील पाच सदस्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. शहरात बागवान गल्ली, बिरदेव चौक परिसर, सहारा चौक परिसरासह विविध भागात कोरोना रुग्ण सापडले आहेत.

पेठ वडगाव शहरात विविध भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आज शहरात मंगळवारी अकरा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. तर बुधवारी बारा रुग्ण आढळले.यामुळे कोरोना रुग्णांची संख्या ६८ झाली आहे. शहराचा लॉक डाऊन काल संपला असून बुधवार दि.१२ पासून सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार जी दुकाने सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार दुकाने सुरु राहणार आहेत. दुकानामध्ये व व्यवसायाच्या ठिकाणी साठ वर्षावरील व्यक्तीना बसण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

शहराच्या आजु बाजूच्या बाधित ग्रामीण भागातील भाजीपाला विक्रेते यांना वडगाव शहरात भाजीपाला विक्रीस बंदी आहे. सर्व व्यापारी व नागरिकांनी मास्क, हॅन्डग्लोव्हज व सॅनिटाझरचा वापर करणे, सोशल डीस्टन्स ठेवणे बंधनकारक आहे. जे नागरिक प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन करतील त्यांचेवर कडक दंडात्मक कारवाईचा इशारा मुख्याधिकारी सुषमा कोल्हे यांनी दिला आहे. नियमांचे पालन न झाल्यास तात्काळ मार्केट व दुकाने बंद करण्याचे आदेश दिले जातील असे मुख्याधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
      

Advertisements

Related Stories

टाकी अंगावर पडल्याने चिमुकल्याचा मृत्यू

Patil_p

धोका वाढला : नागपुरात सलग दुसऱ्या दिवशी 5 हजार पेक्षा अधिक रुग्ण

Rohan_P

मोहिच्या माजी फौजदाराने फुलवला आंब्यांचा मळा तर पत्नी बनल्या 1000झाडांची आई

Patil_p

न्यायालयीन चौकशी पूर्ण झाल्याशिवाय ईडीच्या चौकशीला जाणार नाही – अनिल देशमुख

Abhijeet Shinde

दिलासादायक : महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.54 %

Rohan_P

पश्चिम महाराष्ट्रातील 27 उद्योग पुन्हा सुरू

prashant_c
error: Content is protected !!