तरुण भारत

माजी रणजी क्रिकेटपटू ध्रुव केळवकर यांचे निधन

कोल्हापूरातील मोजक्या रणजी खेळाडूंत केळवकर यांचा समावेश,

प्रतिनिधी / कोल्हापूर

Advertisements

कोल्हापूरातील जुन्या पिढीतील जेष्ठ रणजी क्रिकेटपटू व केडीसीएचे विद्यमान सेक्रेटरी ध्रुव केळवकर (वय 53 वर्षे) यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांच्या निधनाने कोल्हापूरातील एक मितभाषी, गुरुतुल्य, निगर्वी, अष्टपैलु खेळाडू लोप पावले आहे.

ध्रुव केळवकर यांचा जन्म 24 एप्रिल 1967 रोजीचा. त्यांना शालेय वयापासुन क्रिकेटची आवड होती. ते मुंबई येथील पोतदार कॉलेजमध्ये शिकताना प्रशिक्षक विट्टल पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. पोतदार कॉलेजकडून खेळताना त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. या कामगिरीच्या जोरावरच 1989-1990 ला महाराष्ट्र रणजी संघात त्यांची निवड झाली होती. ते डावखुरे फिरकी गोलदांज होते. रणजी पर्दापणाच्या सामन्यात 6 बळी घेतले होते. तसेच जसदनवाला ट्रॉफी, विल्स ट्रॉफी खेळले होते. 10 एप्रिल 1990 रोजी शिवाजी स्टेडियम येथे महाराष्ट्र विरूध्द विल्स क्रिकेट संघ यांच्यात सामना खेळविण्यात आला. या सामन्यात महाराष्ट्र संघातून ते खेळले होते. या सामन्यात उत्कृष्ट गोलदांजी करताना त्यांनी रवी शास्त्री यांचा महत्वपूर्ण बळी घेतला होता.

क्रिकेटनंतर प्रशिक्षणात ठसा

कोल्हापूरातून महाराष्ट्र क्रिकेट संघासाठी जे काही मोजके खेळाडू गेले त्यामध्ये केळवकर यांचा समावेश होता. शास्त्रशुद्ध फलंदजी हे केळवकर यांचे वैशिष्ठय़ होते. क्रिकेट खेळणे बंद केल्यानंतर त्यांनी काही काळ प्रशिक्षक म्हणून ठसा उमटवला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूरातील अनेक खेळाडू घडले. ते एक उत्तम क्युरेटर देखील होते. तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूरातील शिवाजी स्टेडियम येथील खेळपट्टी रणजी सामन्यासाठी तयार केली होती. उभी हयात क्रिकेटसाठी समर्पित करणाऱया केळवकर यांच्या निधनाने आजी-माजी क्रिकेटपटूंना तसेच कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोशिएनला मोठा धक्का बसला आहे. अनुभवी व उत्तम क्रिकेटपटू गमावल्याची भावना प्रतिक्रिया अनेक खेळाडूंनी दिली.

 ध्रुव केळवकर हे डॉ. प्रल्हाद केळवकर व डॉ. उध्दव केळवकर यांचे लहान भाऊ आहेत. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, 2 भाऊ असा परिवार आहे.

Related Stories

कोल्हापूर : पन्हाळा येथील अंधारबाव परिसर ठरतोय वादावादीचे हॉटस्पॉट

Abhijeet Shinde

जानेवारी पेड इन फेब्रुवारी !; महापलिका कर्मचाऱयांना सातवा वेतन आयोग लागू

Abhijeet Shinde

18 वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणासाठी महापालिका सज्ज, मात्र… : महापौर किशोरी पेडणेकर

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्ह्यात`कोविशिल्ड’चे 1 लाख डोस उपलब्ध

Abhijeet Shinde

ड्रेनेजच्या पाण्यातच ‘ट्रीमिक्स’ कामाचा शुभारंभ

Abhijeet Shinde

केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद झाले होम क्वारंटाइन

Rohan_P
error: Content is protected !!