तरुण भारत

सातारा : 87 जण कोरोनामुक्त, 25 नवे रुग्ण

प्रतिनिधी/सातारा

जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 62 नागरिकांना तसेच सातारा शहरातील खासगी रुग्णालयांतून 25 जणांना असे एकूण 87 जणांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले. तर 624 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तसेच क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथे कोरोना टेस्टिंग लॅब सुरु झाली असून त्यात करण्यात आलेल्या चाचणीत 25 जणांचे अहवाल कोरोना बाधित आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमधून डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये जावली तालुक्यातील 4, कराड तालुक्यातील 14, खंडाळा तालुकयातील 5, कोरेगांव तालुक्यातील 1, खटाव तालुकयातील 5, महाबळेश्वर तालुक्यातील 1, माण तालुक्यातील 8, पाटण येथील 1, सातारा येथील 16 व वाई तालुक्यातील 7 असे एकूण 62 नागरिकांचा समावेश आहे. तसेच सातारा शहरातील खाजगी रुग्णालयांतून 25 जणांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले. पॉझिटिव्ह आलेल्या 25 जणांमध्ये फलटण, खंडाळा, खटाव तालुक्यातील रुग्णांचा समावेश आहे.

624 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 36, वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 12, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 28, कोरेगाव 45, वाई येथील 100, शिरवळ येथील 83, रायगाव 23, पानमळेवाडी येथील 35, मायणी येथील 38, महाबळेश्वर येथील 65, पाटण येथील 25, खावली 81, व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथे 53 असे एकूण 624 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत. अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनिल सोनवणे

घेतलेले एकूण नमुने 34154
एकूण बाधित 6225
घरी सोडण्यात आलेले 2893
मृत्यू 197
उपचारार्थ रुग्ण 3135

Advertisements

Related Stories

शिवसेना आक्रमक : कन्नडिगांचे व्यवसाय बंद पाडणार

Amit Kulkarni

सातारा : प्लास्टिक पिशव्यांवर कारवाईची मागणी

datta jadhav

”मराठा समाजाला आरक्षण देण्यात भाजप आणि महाविकास आघाडी सरकार कमी पडलं”

triratna

दारुच्या नशेत सख्या भावाचा खून

Patil_p

जिल्हा पुन्हा एकदा ‘लॉक’

Patil_p

मेणवलीतील नाना फडणवीस यांचा वाडा पर्यटकांसाठी खुला

triratna
error: Content is protected !!