तरुण भारत

सातारा : तारळी नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना

प्रतिनिधी/सातारा

तारळी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली असून धणामधील पाणीसाठा सांडव्यावरुन वाहण्याच्या पातळीपर्यंत पोहोचण्याच्या स्थितीत आहे. तारळी धरणातील एकूण पाणीसाठा 71.25 टक्के झालेला असुन पाणीपातळी 702.15मी. आहे. धरणामधील पाणीसाठा सांडावा पातळीपर्यंत (म्हणजेच 706.30 मी.) पोहोचल्यानंतर कोणत्याही क्षणी सुमारे 2000 क्युसेक्स इतका विसर्ग नदीपात्रामध्ये सुरु होणार आहे.

Advertisements

परिणामी धरणाच्या खालील बाजूस तारळी नदीमधील पात्रात पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे. अशी स्थिती येथुन पुढे पर्जन्य कालावधीमध्ये केव्हाही उद्भवू शकते. त्यामुळे तारळी नदीकाठ लगत असलेल्या गावांतील ग्रामस्थांनी नदीपात्रामध्ये जाऊ नये. तसेच नदीकाठालगत असलेल्या इलेक्ट्रिक मोटारी, डिझेल इंजिन अथवा तत्सम सामुग्री आणि पशुधन सुरक्षित स्थळी हलविण्याच्या सूचना कार्यकारी अभियंता कण्हेर कालावे विभाग क्र. 2, करवडी (कराड) यांनी दिल्या आहेत.

Related Stories

देवदर्शन करुन परतताना दांपत्यावर काळाचा घाला

Patil_p

दापोलीत दुकानदारांवर पथकाची नजर, नियम भंग झाल्यास होणार कारवाई

Shankar_P

शेतकऱ्यांनो धीर धरा, शासन खंबीरपणे आपल्या पाठीशी – मुख्यमंत्री

triratna

प्रशासनाला अंधारात ठेवत बगाड यात्रा

Patil_p

सातारा : राष्ट्रीय महामार्गावर ऑक्सिजन टँकरला गळती

datta jadhav

चळे येथील बालविवाह पोलिसांनी रोखला

triratna
error: Content is protected !!