तरुण भारत

दिलासाः सांगली जिल्हय़ात तब्बल 489 रूग्ण कोरोनामुक्त

नवे 280 रूग्ण वाढलेः 13 जणांचे मृत्यूः मनपा क्षेत्रात 122 वाढलेः ग्रामीण भागात 158 रूग्ण वाढले

प्रतिनिधी/सांगली

Advertisements

बुधवारी जिल्हय़ाला फार मोठा दिलासा मिळाला आहे. तब्बल 489 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे जिल्हय़ातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 60 टक्केपेक्षा अधिक झाले आहे. नवीन 280 रूग्ण वाढले तर उपचार सुरू असताना 13 जणांचे मृत्यू झाले आहेत. त्यामध्ये जिल्हय़ातील 11 जणांचा आणि परजिल्हय़ातील दोघांचा समावेश आहे. एकूण जिल्हय़ात 176 जणांचा आजअखेर कोरोनाने बळी गेला आहे.

महापालिका क्षेत्रात 122 रूग्ण वाढले

महापालिका क्षेत्रात पुन्हा बुधवारी 100 हून अधिक रूग्ण वाढत होते.  त्यामध्ये सांगली शहरात 82 तर मिरज शहरात 40 रूग्ण वाढले आहेत. महापालिकेकडून मोठय़ाप्रमाणात ऍण्टीजन टेस्ट सुरूच ठेवल्या आहेत. आजपर्यंत सात हजार सातशेहून अधिक जणांच्या त्यांनी ऍण्टीजन टेस्ट केल्या आहेत. त्यामुळे त्यामध्ये मोठयासंख्येने रूग्ण वाढत चालले आहेत.  सांगली शहरात जे नवीन रूग्ण वाढले आहेत. ते रूग्णांच्या संपर्कात आलेले नातेवाईक आहेत. शंभरफुटी, एमएसईबी रोड, गर्व्हेमेंट कॉलनी, विजयनगर पुर्वा गार्डनजवळ, शिंदे मळा, विद्या हौसिंग सोसायटी, सांगलीवाडी, अभयनगर, सहय़ाद्रीनगर, गुलमोहोर कॉलनी, खणभाग, हरीपूर रोड गावभाग  या भागातील हे रूग्ण आहेत. तर मिरजेत जे रूग्ण आढळून आले आहेत. ते भारतनगर, जीएमसीएच, साईनाथ पार्क, इंदिरानगर, बेथेलहेमनगर, मंगळवार पेठ, लोकमान्य कॉलनी, नदीवेस याठिकाणी आढळून आले आहेत. सांगली मिरज महापालिका क्षेत्रात मात्र आजअखेर एकूण रूग्णसंख्या तीन हजार 223 झाली आहे.

ग्रामीण भागात बुधवारी सर्वाधिक 158 रूग्ण वाढले

सांगली महापालिका क्षेत्रात रूग्णसंख्या आटोक्यात येत असताना बुधवारी मात्र ग्रामीण भागात तब्बल 158  रूग्ण आढळून आले त्यामध्ये आटपाडी तालुक्यात आठ, जत तालुक्यात तीन, कडेगाव तालुक्यात 12, तर कवठेमहांकाळ तालुक्यात सात  रूग्ण वाढले आहेत. खानापूर तालुक्यात चार, मिरज तालुक्यात मोठय़ाप्रमाणात रूग्ण वाढले असून 37 रूग्ण याठिकाणी वाढले आहेत. पलूस तालुक्यात सात, शिराळा तालुक्यात नऊ, तासगाव तालुक्यात 26 आणि वाळवा तालुक्यात विक्रमी 45 रूग्ण वाढले आहेत.  असे एकूण ग्रामीण भागात 158 रूग्ण वाढले आहेत.

जिल्हय़ातील 11 जणांचा मृत्यू

बुधवारी जिल्हय़ातील 11 जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. यामध्ये सांगली शहरातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील 73 वर्षीय व्यक्तीचा कोरोना रूग्णालयात तर 65 वर्षीय व्यक्तीचे मिरज चेस्ट हॉस्पिटल मध्ये मृत्यू झाला आहे. 64 वर्षीय व्यक्तीचा घाटगे हॉस्पिटलमध्ये तर  69 वर्षीय व्यक्तीचा  भारती हॉस्पिटल येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला. मिरजेतील  33 वर्षीय व्यक्तीचा भारती हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. कुपवाड येथील 46 वर्षीय व्यक्तीचा कोरोना रूग्णालयात मृत्यू झाला.तर 68 व्यक्तीचा विवेकानंद हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. भोसे येथील 38 वर्षीय व्यक्तीचा कोरोना रूग्णालयात मृत्यू झाला. शिराळा  तालुक्यातील कोकरूड येथील 65 वर्षीय व्यक्तीचा कोरोना रूग्णालयत तर पलूस तालुक्यातील वसगडे येथील 85 वर्षीय महिलेचा भारती हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला तर खानापूर तालुक्यातील धोंडगेवाडी येथील 55 वर्षीय व्यक्तीचा मिरज चेस्ट हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.  या 11 व्यक्तीच्या मृत्यूमुळे जिल्हय़ातील एकूण बळीची संख्या 176  झाली आहे. कोल्हापूर जिल्हय़ातील दोघांचे मृत्यू झाले आहेत.  कोल्हापूर जिल्हय़ातील जयसिंगपूर  येथील 34 वर्षीय व्यक्तीचा कुल्लोळी हॉस्पिटल येथे तर इचलकरंजी येथील 62 वर्षीय व्यक्तीचा भारती हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. परजिल्हय़ातील 55 जणांचे आजअखेर मृत्यू झाले आहेत.

सांगलीला सलग दुसऱया दिवशी मोठा दिलासा

मंगळवारी जिल्हय़ाला कोरोनाने पहिल्यांदा मोठा दिलासा मिळाला होता. त्यामध्ये जिल्हय़ात वाढलेल्या रूग्णसंख्येपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांची संख्या जादा झाली होती. तोच दिलासा बुधवारी मिळाला आहे. बुधवारी कोरोना रूग्णांची वाढलेली संख्या 280 आहे तर कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांची संख्या त     ब्बल 489 इतकी आहे. त्यामुळे रूग्ण वाढीपेक्षा बरे होणाऱयांची संख्या आता वाढत चालली आहे. ही  दिलासा देणारी गोष्ट ठरली आहे. जिल्हय़ात आजअखेर बरे झालेल्या रूग्णांची संख्या दोन हजार 781 झाली आहे. त्यामुळे रूग्ण बरे होण्याची टक्केवारी 60 वर गेली आहे.

भाजपाच्या आमदारांना कोरोनाची लागण

जिल्हय़ातील वजनदार असणाऱया भाजपाच्या आमदाराला कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या कुटुंबांतील एकूण सात सदस्य बाधित झाले आहेत. त्यामध्ये हे भाजपाचे नेते तसेच त्यांच्या पत्नी, मुलगा, दोन सूना, नातवंडे यांना लागण झाली आहे. त्यांच्यावर सांगली-मिरज रोडवरील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तर कुपवाड येथे कार्यरत असणाऱया एका पोलीसाचा मात्र कोरोनाचे उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. जिल्हय़ात कोरोनाने मृत्यू झालेला हा पहिलाच पोलीस आहे.

कोरोनाची जिल्हय़ातील स्थिती

एकूण रूग्ण    5270

बरे झालेले     2781

उपचारात      2313

मयत           176

Related Stories

महाराष्ट्रात म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढले

datta jadhav

‘ग्रामसंघ स्थापन केल्याने महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम होतील’

Abhijeet Shinde

महाराष्ट्रातील कोरोना : आतापर्यंत 59 लाख रुग्ण कोरोनामुक्त!

Rohan_P

संभाव्य पुराच्या काळात वीज खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी : करवीर शिवसेना

Abhijeet Shinde

रेमेडीसिवीरचा काळाबाजार करणारी टोळी जेरबंद

Patil_p

चंदीवाल आयोगाने माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना ठोठावला 25 हजारांचा दंड

Rohan_P
error: Content is protected !!