तरुण भारत

कमला हॅरिस यांना उपाध्यक्षपदाची संधी

भारतीय वंशाच्या महिला : अमेरिकेतील निवडणुकीत डेमोक्रेटिक पक्षाकडून उमेदवारी

वॉशिंग्टन / वृत्तसंस्था

Advertisements

मूळ भारतीय असलेल्या कमला हॅरिस यांची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत उपाध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून निवड झाली आहे. या पदासाठी निवडणूक लढवणाऱया त्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला असणार आहेत. त्या भारतीय-जमैकन वंशाच्या आहेत. डेमोपेटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांनी बुधवारी त्यांच्या नावाची घोषणा केली.

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोपेटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन हे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरुद्ध उमेदवार असतील. ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आहेत. विद्यमान उपाध्यक्ष माइक पेन्स पुन्हा एकदा ट्रम्प यांच्यासोबत उपाध्यक्ष पदाचे उमेदवार असून त्यांची लढत कमला हॅरिस यांच्याविरुद्ध होईल.

जो बायडन यांनी ट्विट करत उपाध्यक्षपदासाठी हॅरिस यांच्या नावाची घोषणा केली. कमला हॅरिस हय़ा लढवय्या आणि अमेरिकेतील सर्वोत्तम नोहरशहांपैकी एक असल्याने त्यांच्या उमेदवारीची घोषणा करताना मला अभिमान वाटतो, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. कमला हॅरिस यांनीही ट्विट करत बायडन यांचे आभार मानले आहेत. उपाध्यक्षपदाच्या उमेदवार या नात्याने ‘कमांडर-इन-चीफ’ बनवण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करीन, असे हॅरिस यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

55 वर्षीय कमला हॅरिस यांचा जन्म कॅलिफोर्नियातील ऑकलँडमध्ये झाला. त्यांचे आई-वडील स्थलांतरित होते. त्यांच्या आईचा जन्म भारतात तर वडिलांचा जन्म जमैका येथे झाला आहे. त्यांनी हॉर्वर्ड विद्यापीठातून त्यांनी शिक्षण पूर्ण केले असून कॅलिफोर्निया विद्यापीठातून कायद्याची पदवीही घेतली आहे. काही दिवस वकिली व्यवसाय केल्यानंतर त्या कॅलिफोर्निया राज्याच्या ऍटर्नी जनरलपदी विराजमान झाल्या होत्या. तसेच दोन वेळा ऍटर्नी जनरल राहिल्यानंतर 2017 साली त्या खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. त्या डिसेंबरमध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून बाहेर पडल्या होत्या.

महिलांना यापूर्वीही संधी, मात्र…

अमेरिकेच्या इतिहासात यापूर्वीही महिलेला उपराष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी मिळाली होती. 2008 मध्ये रिपब्लिकन पक्षाने सारा पॅलिन यांना उमेदवारी दिली होती. तर 1984 मध्ये डेमोपेटिक पक्षाने गिरालाडिन फेरारो यांना उमेदवारी दिली होती. मात्र, या दोन्ही महिलांचा निवडणुकीत पराभव झाला होता. अमेरिकेतील दोन्ही प्रमुख पक्षांनी आजवर कृष्णवर्णीय महिलेला अध्यक्षपदाची उमेदवारी दिलेली नाही आणि आजवर कुठलीच महिला अमेरिकेची राष्ट्राध्यक्षही झालेली नाही.

Related Stories

जपानच्या तळावरून युएईची ‘मंगळ’झेप

Patil_p

‘या’ लसीबाबत संभ्रम कायम; अनेक देशात निर्बंध

datta jadhav

ऑस्ट्रेलियात भारतीय विमानांना ‘नो एन्ट्री’

datta jadhav

डासांमुळे होत नाही कोरोनाचा प्रसार

Patil_p

फ्रान्सच्या माजी अध्यक्षांना वर्षाची शिक्षा

Amit Kulkarni

नेतान्याहू संबंधातील निर्णय न्यायालयाने टाळला

Patil_p
error: Content is protected !!