तरुण भारत

देशात रुग्णसंख्या 23 लाखांच्या पुढे

दिवसभरात जवळपास 61 हजार रुग्ण : 834 रुग्णांचा मृत्यू

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

देशात कोरोना बाधितांचा आकडा बुधवारी 23 लाखांच्या पुढे गेला. आतापर्यंत देशात 23 लाख 29 हजार 638 लोक पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. मागील 24 तासात 60 हजार 963 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तसेच एका दिवसात 834 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दिलासादायक बाब म्हणजे एका दिवसात 56 हजार 110 रुग्ण बरे होऊन इस्पितळातून घरी परतले आहेत. कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा आता 16 लाखांपेक्षा जास्त झाला असून रिकव्हरी रेट 70.38 टक्क्यांवर पोहोचला आहे. तसेच मृत्यूदर 1.98 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.

देशात सध्या 6 लाख 43 हजार 948 सक्रिय रुग्ण आहेत. कोरोनाने आतापर्यंत 46 हजार 91 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात 16 लाख 39 हजार 599 लोक रिकव्हर झाले असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशातील 7 राज्यांमध्ये कोरोनाची प्रकरणे 1 लाखांच्या पुढे गेली आहेत. महाराष्ट्राबरोबरच तामिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटक, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालचा यामध्ये सहभाग आहे.

7.33 लाख नमुन्यांची तपासणी

देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 11 ऑगस्टपर्यंत 2 कोटी 60 लाख 15 हजार 297 नमुने तपासले गेल आहेत. यातील 7 लाख 33 हजार 449 नमुने मंगळवारी एका दिवसात तपासण्यात आले असल्याची माहिती आयसीएमआरने दिली आहे.

Related Stories

पेट्रोल-डिझेल दराचा भडका

Patil_p

मोदी सरकारने कोरोना महामारी, पेट्रोल डिझेलचे दर अनलॉक केले : राहुल गांधी

Rohan_P

देशात 38,074 नवे कोरोना रुग्ण

datta jadhav

16 वर्षीय विद्यार्थीनीची आत्महत्या

Patil_p

देशात 2.59 लाख नवे बाधित

datta jadhav

महागाईचा भडका : पहिल्यांदाच पेट्रोलपेक्षा डिझेल महाग

Rohan_P
error: Content is protected !!