तरुण भारत

कोरोनाबळींच्या संख्येत मेक्सिको जगात तिसऱ्या स्थानावर

ऑनलाईन टीम / मेक्सिको सिटी :

कोरोनाबळींच्या संख्येत मेक्सिको जगात तिसऱ्या स्थानावर आहे. मेक्सिकोत आतापर्यंत 4 लाख 98 हजार 380 रुग्ण आढळून आले. त्यामधील 54 हजार 666 जणांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. 

Advertisements

बुधवारी मेक्सिकोत 6686 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 926 जणांचा मृत्यू झाला. कोरोना रुग्णसंख्येच्या बाबतीत मेक्सिकोचा जगात सातवा क्रमांक लागतो. 4.98 लाख रुग्णसंख्येपैकी 3 लाख 36 हजार 635 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर अजूनही 1 लाख 07 हजार 079 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामधील 3775 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. 

मेक्सिकोत आतापर्यंत 11 लाख 12 हजार 114 जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. 

Related Stories

एच-1बी संबंधी अमेरिकेत नवे विधेयक

Patil_p

इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्या मुलाने मागितली हिंदूंची माफी

datta jadhav

‘मृत्यूच्या गुहे’त 6 हजार वर्षांपूर्वींचा सांगाडा

Patil_p

चीनला धमकाविण्याचा काळ संपला : जिनपिंग

Amit Kulkarni

कुवैतचे राजे शेख सबाह यांचे निधन

datta jadhav

नीरव मोदीच्या भावावर अमेरिकेत अपहाराचा गुन्हा

Patil_p
error: Content is protected !!