तरुण भारत

खासदार नवनीत राणा अस्वस्थच; पुढील उपचारासाठी मुंबईला!

ऑनलाईन टीम / नागपूर :


अमरावतीच्या खासदार नवनीत राणा-कौर यांना कोरोनाची लागण झाली असून मागील काही दिवसांपासून नागपूरमधील वोकहार्ट हॉस्पिटलमध्ये  त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, त्यांच्या प्रकृती पाण्याचे तशी सुधारणा होत नसल्याने त्यांना आज  पुढील उपचारासाठी मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

Advertisements


मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागला तसेच छातीत दुखत असल्याने त्यांना आज मुंबईत नेण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. 
सुरवातीला खासदार नवनीत राणा यांचा कोरोनाची बाधा झाल्यावर त्यावेळी त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. मात्र, त्यांची प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना उपचारासाठी नागरपूरला हलविण्यात आले होते. 


दरम्यान, नवनीत राणा यांच्यासह पती आणि आमदार रवी राणा, दोन्ही मुले, सासू-सासरे असे कुटुंबातील 12 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. जवळपास सहा दिवसांपूर्वी नवनीत राणा यांचा अहवाला कोरोना पॉझिटिव्ह आला होता. नवनीत राणा यांच्या सासू-सासऱ्यांवर नागपूरच्या वोकहार्ट हॉस्पिटलमध्ये आधीपासूनच उपचार सुरु आहेत.

Related Stories

अंगारक संकष्टी : श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाकडून ऑनलाईन दर्शनाची सोय

Rohan_P

लॉकडाऊनचा फटका इस्रोलाही; 10 महत्वकांक्षी प्रकल्प रखडले

datta jadhav

खा. उदयनराजेंचे जावलीत ढिश्यूम.. ढिश्यूम..

datta jadhav

सांगली जिल्हा वार्षिक योजनेसाठी अतिरिक्त 106 कोटी निधी

Sumit Tambekar

हनुमानसारखे पर्वत आणायला घराबाहेर पडू नका : अजित पवार 

prashant_c

कृषी कायद्यात ‘दोष’ नाहीतच!

Patil_p
error: Content is protected !!