तरुण भारत

हल्लेखोरांवर कठोर कारवाई करा

प्रतिनिधी/ बेळगाव :

महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि महाराष्ट्र आयएमएचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक नुकतीच झाली. या बैठकीत महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. साधना तायडे, आयएमएचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे, हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाचे चेअरमन डॉ. मंगेश पाटे आणि आयएमएचे माजी राज्य सचिव डॉ. सुहास पिंगळे हे उपस्थित होते.

Advertisements

या बैठकीत लातूर, अहमदनगरसह अनेक ठिकाणी कोरोना योद्धा असणाऱया डॉक्टरांवर हल्ले झाले. त्यामुळे महाराष्ट्र मेडिकेअर सर्व्हिस हिंसाचार विरोधी कायदा कडकपणे अंमलात आणावा आणि त्याची अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी आयएमएने केली. आरोग्य मंत्र्यांनी ही मागणी मान्य केली.अनेक ठिकाणी राजकीय पक्षांचे कार्यकर्ते हॉस्पिटलमध्ये जाऊन दमदाटी करणे, बिल न भरण्यासाठी धमक्मया देणे आणि गुंडगिरीच्या घटनांचे चित्रीकरण करून त्याचा व्हिडीओ व्हायरल करणे असे प्रकार होत आहे. त्यामुळे डॉक्टर दहशतीखाली वावरत आहेत, असेही आरोग्य मंत्र्याच्या निदर्शनास आणून दिले.

महात्मा फुले योजना व अन्य कोविड व्यवस्थापनासाठी नमूद केलेले दर हे अव्यवहार्य आहे हे दर ठरविताना आयएमए किंवा हॉस्पिटलच्या प्रतिनिधीशी चर्चा केली गेलेली नाही. वैद्यकीय विमा कंपन्यांचे सध्याचे दर लक्षात घेतले गेलेले नाही. आयसीयू, ऑक्सिजन, इंन्फेक्शन कंट्रोल, पीपीई, मास्क, उपकरणे, कर्मचाऱयांचे पगार, वाहतूक, वैद्यकीय कचऱयांचे विघटन या सर्व खर्चाचा सरकारने विचार केला नाही. त्यामुळे या पुढील काळासाठी आयएमएशी चर्चा करून नवीन दर ठरवावेत, अशी मागणी करण्यात आली.

पीपीई किटस आणि मास्क यांच्या दरावर नियंत्रण नाही. याकडे लक्ष वेधता ते माफक दरात उपलब्ध करून देण्याचे आश्वासन आरोग्य मंत्र्यांनी दिली. सरकारी डॉक्टर कर्मचारी, पोलीस आणि पत्रकार यांच्यासाठी सरकारने 50 लाखाचा विमा जाहीर केला परंतु खासगी डॉक्टरांनी सरकारच्या सूचनेनुसार सेवा बजावली त्यांना ही योजना लागू केली जावी. कोरोना योद्धा म्हणून काम करणाऱया 45डॉक्टरांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे आयएमएने आरोग्य मंत्र्यांकडे लक्ष वेधले.

प्रसार माध्यमांमध्ये डॉक्टर आणि हॉस्पिटलची निष्कारण होणारी बदनामी थांबवावी, गैर व्यवहार झाल्याचे सिद्ध झाल्यास त्याबद्दल जनिश्चित कारवाई करावी, पण तमाम डॉक्टरांना दोषी ठरवू नये, अशी मागणी डॉ. अविनाश भोंडवे यांनी केली. डॉक्टरांच्या सर्व तक्रारींबाबत गांभीर्याने विचार केला जाईल, आणि त्याबाबतची माहिती आयएमएला दिली जाईल, असे आश्वासन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आयएमएच्या डॉक्टरांनी दिली.

Related Stories

चिकन, फळ दुकानदारांवर गुन्हे

Amit Kulkarni

विसर्जन तलावांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

Amit Kulkarni

वाहन चालविण्याचा परवाना नसताना 7 लाख देण्याचे आदेश

Patil_p

हात जोडतो, आम्हाला गावी जाऊ द्या…

Patil_p

ईएसआय हॉस्पिटलवरच उपचार करण्याची गरज

Amit Kulkarni

शिक्षकांची शाळा उद्यापासून सुरू होणार

Patil_p
error: Content is protected !!