तरुण भारत

जांबेटी येथे छायाचित्रकारांची गळफास घेऊन आत्महत्या

जांबोटी / वार्ताहर :

जांबोटी ता. खानापूर येथील बसस्थानकावर स्वत:च्या दुकानातच एका छायाचित्रकारानी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीला आली आहे. संदीप सुरेश पिळणकर ( वय 28 ( राहणार जांबोटी-रामापूर पेठ असे आहे.

या बाबतची अधिक माहिती अशी की, संदीप सुरेश पिळणकर हा युवक गेल्या सात-आठ वर्षापासून जांबोटी बसस्थानकावरील कुडतूरकर यांच्या कॉम्प्लेक्समधील दुकान गाळा भाडय़ाने घेऊन फोटोग्राफी व झेरॉक्स सेंटर चालवित होता. त्याचे मूळगाव चंदगड तालुक्यातील कान्नूर (बेरड) होते. मात्र गेल्या सात-आठ वर्षापासून तो व्यवसायानिमित्त रामापूरपेठ-जांबोटी येथील आपल्या बहिणीच्या घरी वास्तव्यास होता. नेहमीप्रमाणे बुधवारी रात्री जेवण झाल्यानंतर दुकानामध्ये काम आहे असे सांगून घरातून बाहेर पडला. मात्र गुरुवारी सकाळी उशीरापर्यंत घरी परतल्या नसल्यामुळे बहिणीने त्याची चौकशी केली. तसेच दुकानामध्ये जाऊन पाहिले असता संदीपने दुकानातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले. आत्महत्या करण्यामागचे नेमके कारण समजू शकले नाही. संदीपच्या पश्चात आई, भाऊ, बहिण असा परिवार आहे. आत्महत्येची घटना समजल्यानंतर संदपीच्या मित्र मंडळीनी दुकानासमोर गर्दी केली होती. तो मनमिळावू स्वभावाचा असल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

जांबोटी पोलीस आऊट पोस्टचे हवालदार एन. के. पाटील यांनी घटनेची माहिती वरिष्ठाना कळविल्यानंतर गुरुवारी दुपारी खानापूरचे पोलीस निरीक्षक बसगौडा पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह खानापूर येथील सरकारी दवाखान्यात पाठवून देण्यात आला. 

Related Stories

स्वामी समर्थ भक्त परिवारातर्फे कोरोना योद्धय़ांचा सत्कार

Amit Kulkarni

कर्नाटक राज्य माध्यमिक शिक्षक संघाची बैठक

Amit Kulkarni

बेळगाव जिल्हय़ात साडेतीन हजार अहवाल निगेटिव्ह

Rohan_P

मलप्रभा नदीकाठावर जमविली देव-देवतांची छायाचित्रे

Patil_p

गिजवणेचा युवक अपघातात ठार

Patil_p

लैला शुगर्सच्या 2500 पहिला हप्ता जमा

Patil_p
error: Content is protected !!