तरुण भारत

मोटोरोला फोल्डेबल 5 जी फोन सादर करण्याच्या तयारीत

वृत्तसंस्था / नवी दिल्ली :

मोटोराला कंपनी आपला फोल्डेबल फोन मोटो रेजर 2019 चे 5 जी मॉडेल सादर करण्याच्या तयारीत असून यांची जोरदार तयारी सुरु असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार कंपनी सदर स्मार्टफोनचे सादरीकरण पुढील महिन्यात करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मोटो रेजर 5 जी या मॉडेलमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रगन 765 जी प्रोसेसरसोबत येणार आहे. सोबत यामध्ये 8 जीबी रॅम आणि 265 जीबी स्टोरेजचा पर्याय दिलेला आहे. फोनमध्ये फोटोसाठी 48 मेगापिक्सलचा रिअर आणि 20 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमरा राहणार आहे. तर 18 वॅटची फास्ट चार्जिंगची बॅटरी  2845 एमएएच क्षमतेची मिळणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

मॉडेलची चर्चा

मागील काही दिवसांमध्ये मोटोरोलाकडून या अपकमिंग फोनचा फोटो लिक झाला होता. या फोटोला पाहून अनेक प्रश्न निर्माण झाले होते. परंतु मागील वर्षात आलेल्या मोटो रेजरच्या तुलनेत या मॉडेलचा लुक काही प्रमाणात वेगळा असल्याची माहिती आहे. कारण नवीन मॉडेलमध्ये फ्रन्ट फेसिंग, फिंगरप्रिन्ट स्कॅनर यांना वगळले आहे.

Related Stories

प्राप्तिकरकडून 1.18लाखकोटींचा परतावा सादर

Patil_p

जिओमध्ये अमेरिकन कंपनी ‘सिल्वर लेक’ची 5,656 कोटींची गुंतवणूक

pradnya p

भारतीय शेअर बाजारात तेजीची झुळूक

Patil_p

एचडीएफसी लाइफ नफ्यात

Patil_p

‘बिग बास्केट’ने केली 12 हजार जणांची भरती

Patil_p

आयकीयाची उद्योग विस्तारासाठी धडपड

Patil_p
error: Content is protected !!